पेट्रोल, डिझेलच्या किंमतींमध्ये (Price of Petrol & Diesel) आज देशातील चार प्रमुख मेट्रो सिटीज मध्ये वाढ झाली आहे. भारताची राजधानी दिल्ली (Delhi) मध्ये पेट्रोलचे दर 24 पैशांनी वाढून प्रति लीटर 93.68 झाली आहे तर डिझेल 29 पैशांनी वाढलं आहे. त्याची किंमत आज 84.32 वरून 84.61 प्रतिलीटर झाल्याची माहिती इंडियन ऑईल कॉरपरेशन ने दिली आहे. तर मुंबई (Mumbai) मध्ये पेट्रोलचे दर शंभरी नजिक पोहचत आहेत. आज मुंबईत पेट्रोल प्रतिलीटर 99.94 आहे तर डिझेल साठी 91.87 रूपये मोजावे लागणार आहेत.
दरम्यान भारतामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये यापूर्वीच पेट्रोलच्या किंमतीने 100 री पार केलेली आहे. इंधनाचे दर हे प्रत्येक राज्यातील व्हॅट वर अवलंबून असतात त्यामुळे ते विविध भागात वेगवेगळ्या किंमतीमध्ये पहायला मिळतात. सध्या 4 मे च्या तुलनेत आता पेट्रोल डिझेलचे दर हा 12 पट आहेत. तर महिन्याभरामध्ये देशात पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये 3 रूपयांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्राच्या शहरातील आजच्या पेट्रोल , डिझेलच्या किंमती पहा इथे.
पहा मुंबई, दिल्ली, चैन्नई, कोलकत्ता मधील इंधनाचे दर
शहर | पेट्रोलचे दर | डिझेलचे दर |
---|---|---|
दिल्ली | 93.68 | 84.61 |
मुंबई | 99.94 | 91.87 |
चैन्नई | 95.28 | 89.39 |
कोलकाता | 93.72 | 87.46 |
राज्या राज्यातील ऑईल मार्केटिंग कंपनी इंडियन ऑईल कॉरपरेशन, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम देखील जगात क्रुड ऑईलच्या किंमतींमध्ये होत असलेल्या बदलांनुसार आपल्या किंमती कमी-जास्त करत असतात. दरम्यान प्रत्येक दिवसाचे इंधनाचे दर हे सकाळी 6 वाजता जाहीर केले जातात आणि त्याची त्या दिवसभरासाठी अंमलबजावणी केली जाते.