Prashant Kishor: प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश नाही, पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने ट्विटरद्वारे दिली माहिती

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला ( Randeep Surjewala) यांनी प्रसारमाध्यमांमधील वृत्तांचे खंडण केले आहे. प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये सहभागी होण्यास स्वत:हून नकार दिला आहे, असे सुरजवाला यांनी म्हटले आहे.

Prashant Kishor | (Photo Credits-Twitter)

राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) काँग्रेस (Congress) प्रवेश करणार अशा अनेक बातम्या प्रसारमाध्यमांतून आल्या. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला ( Randeep Surjewala) यांनी प्रसारमाध्यमांमधील वृत्तांचे खंडण केले आहे. प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये सहभागी होण्यास स्वत:हून नकार दिला आहे, असे सुरजवाला यांनी म्हटले आहे. प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत पाठीमागील अनेक दिवसांपासून चर्चा होती. राजकीय वर्तुळातही याबाबत अनेक चर्चा होत्या. रणदीप सुरजेवाला यांच्या विधनानंतर या चर्चा केवळ चर्चाच ठरल्या आहेत. दरम्यान, प्रशांत किशोर यांची काँग्रेसबाबतची भूमिका स्पष्ट होऊ शकली नाही.

रणदीप सुरजेवाला यांनी मंगळवारी (26 एप्रिल) केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास स्वत:न नकार दिला आहे. माहितीसाठी असे की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये सहभागी होणे आणि त्यांच्यासोबत 2024 बाबत एक मोहीमेवर काम करण्यासाठी एक समिती नेमली होती. एकूण 13 सदस्यांच्या या समितीने आपला अहवाल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सोपवला आहे. काँग्रेस नेत्यांच्या बैठकीतही सोमवारी याबाबत चर्चा झाली. काँग्रेस महासचिव प्रियंका गांंधी यांच्यासह अेक नेत्यांनी प्रशांत किशोर यांना पक्षात प्रवेश देण्यासाठ अनुकुल मत नोंदवले होते. मात्र, दिग्विजय सिंह यांच्यासह इतर अनेक नेत्यांनी त्याला विरोध केला होता. तसेच, अनेक शंका उपस्थित केल्या होत्या. (हेही वाचा, Congress: प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती)

ट्विट

प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याबद्दल काँग्रसमध्ये प्रदीर्घ काळापासून मतमतांतरे आहेत. आज सर्व शक्यतांना पूर्ण विराम मिळाला. दरम्यन, इंडियन पॉलिटीकल अॅक्शन कमेटीचे तेलंगणा राष्ट्र समितीसोब असलेले नातेही किशोर आणि काँग्रेस यांच्यातील नाते तोडण्यास कारणीभूत ठरले. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, प्रशांत किशोर यांनी स्वत:च म्हटले की, आपण काँग्रेसमध्ये सहभागी होणार नाही. त्यांनी यामागचे कारण स्पष्ट केले नाही.