पंतप्रधान 'वय वंदन' योजनेसाठी आधार कार्ड अनिवार्य, जाणून घ्या नियम
Aadhar Card (Photo Credits: PTI)

सरकारकडून जेष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना सुरु करण्यात आली आहे. वय वंदन योजना असे त्याचे नाव असून जेष्ठ नागरिकांना पेन्शन दिली जाते. या योजनेची घोषणा 2017-18 आणि 2018-19 या वर्षात सादर करण्यात आलेल्या युनियन बजेट मध्ये करण्यात आली होती. योजनेअंतर्गत 8.8.83 टक्क्यांपर्यंत परतावा देते. मात्र व्यक्ती कोणत्या प्रकारची योजना निवडतो आणि योजनेचे कार्य एलआयसी अंतर्गत केले जात आहे.

आर्थमंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या एका नोटिसनुसार, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 23 डिसेंबरला अधिसूचना जारी करत अधिनियम, 2016 अंतर्गत सांगण्यात आले आहे. वय वंदन योजनेचा लाभ घेण्यापूर्वी करण्यात येणाऱ्या रजिस्ट्रेशनच्या वेळी आधार कार्ड दाखवणे गरजेचे असणार आहे.

तसेच जर खराब बायोमेट्रिक किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे आधार ऑथेंटिकेशन फेल झाल्यास त्यासाठी वेगळे मार्ग वापरले जाणार आहेत. त्यामध्ये इंटीग्रेटेड रिस्क इन्फोर्मेशन सिस्टिम किंवा फेस ऑथेंटिकेशन, आधार वन-टाइम पासवर्ड यांचा वापर केला जाणार आहे. सरकारने 4 मे 2017 मध्ये पंतप्रधान वय वंदन योजना लॉन्च केली होती. यामागील मुख्य कारण म्हणजे जेष्ठ नागरिकांना गुंतवणूकीसाठी अधिक ऑप्शन उपलब्ध करुन देत त्यांचे जीवन सुखरुप होणे होते.(नव्या वर्षात 'या' कंपनीचे शेअर्स ठरतील तुमच्यासाठी फायदेशीर)

2017 मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत अधिकाधिक 7.5 लाखापर्यंत गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. मात्र 2018-19 च्या आर्थिक संकल्पात याची रक्कम वाढवत 15 लाख करण्यात आली होती. वय वंदन योजनेत पैसे गुंतवणूक करण्यासाठी 31 मार्च 2020 पर्यंतची मुदत देऊन करण्यात आली आहे. यापूर्वी या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी 3 मे 2018 पर्यंतचा कालावधी देण्यात आला होता.