पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत घेणार बैठक, कोरोनाच्या विरोधातील रणनीति संदर्भात करणार चर्चा
PM Narendra Modi | (Photo Credits: ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi) आज (18 मे)  कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी आज देशातील विविध जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत रणनीति ठरवणार आहेत. सकाळी 11 वाजता राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉफ्रेंन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत. यावेळी  कोरोनाच्या विरोधात लढण्याच्या मॉडेलवर चर्चा करणार आहेत. तर अधिकाऱ्यांसोबत कोरोना व्हायरसच्या दरम्यान त्यांच्या अनुभवांबद्दल बातचीत करणार आहेत. अधिकारी विशेष रुपात शहरी आणि ग्रामीण विभागात सुरु असलेल्या कोविडच्या विरोधातील संघर्षाबद्दल मिळालेल्या सिफारशी आणि विचारांबद्दल चर्चा करणार आहेत.

आज होणाऱ्या बैठकीत कर्नाटक, बिहार, आसाम, चंदीगढ. तमिळनाडू, उत्तराखंड. मध्य प्रदेश, गोवा, महाराष्ट्र, दिल्ल, हिमाचल प्रदेशासह दिल्लीतील अधिकारी सहभागी होणार आहेत. यामधील काही जिल्ह्यात कोरोनाचा प्रचंड प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. विविध राज्य आणि जिल्ह्यातील कोविड19 च्या विरोधात लढण्यासाठी नेतृत्व केले जाणार आहे.(Shahid Jameel या विषाणूतज्ञाने केंद्र सरकारच्या COVID-19 Genome Surveillance Project ला ठोकला रामराम; देशातील कोरोनास्थिती हाताळण्यावरून केली होती टीका)

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या विरोधात लढण्यासाठी काही महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.भारतात कोरोनाचे आणखी 2,63,533 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 4329 जणांचा बळी गेला आहे. तर 4,22,436 जणांचा डिस्चार्ज दिला गेला आहे. तसेच एकूण 2,52,28,996 रुग्ण असून आतापर्यंत 2,15,96,512 जणांना डिस्चार्ज दिला गेला आहे. देशात एकूण 2,78,719 नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्याचसोबत 33,53,756 अॅक्टिव्ह रुग्ण असून 18,44,53,149 जणांचे लसीकरण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दिली आहे.

भारतामध्ये महाराष्ट्रात कोरोना वायरसमुळे स्थिती चिंताजनक बनलेली आहे. महाराष्ट्रात डबल म्युटंट आढळल्यानेही संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचं समोर आलं आहे. हा डबल म्युटंट B.1.617 आहे. हा पहिल्यांदा महाराष्ट्रात आढळला आणि नंतर तो इतर राज्यांत पसरल्याचा दावा देखील केला जातो.