पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापूर दौऱ्यावर ; आसियान समिटमध्ये होणार सहभागी
पीएम मोदी (Photo Credits: PIB)

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (13/11/2018) रोजी सिंगापूर दौऱ्यासाठी रवाना झाले. तिथे ते पूर्व एशिया शिखर संमेलन आणि भारत आसियान समिटमध्ये सहभागी होतील. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी 14-15 नोव्हेंबरला असलेल्या विविध कार्यक्रमातही सहभागी होतील. तसंच या दौऱ्यादरम्यान पीएम मोदी अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या प्रतिनिधींसोबत बैठक करतील.

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती माइक पेंस यांची बुधवारी भेट होणार आहे. या बैठकीत दोघांमध्ये महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये द्विपक्षीय सुरक्षा सहकार्य आणि स्वतंत्र, खुल्या हिंदी महासागरात प्रवेशाबाबतची धोरणे यावर चर्चा होऊ शकते.

व्हाईट हाऊसमधून प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, पंतप्रधान मोदी आसियान नेत्यांसोबत भारत-आसियान शिखर बैठकीत सहभागी होतील. ही बैठक सकाळी नाश्त्याच्या वेळी होईल.

भारत आणि आसियान यांच्यादरम्यान व्यवहार, आर्थिक संबंध आहेत. 2017-18 मध्ये भारत-आसियान यांच्यात 81.33 अरब डॉलरचा व्यवहार झाला. भारताच्या एकूण व्यापारपैकी हा 10.58% आहे. भारताच्या एकूण निर्यातीत आसियान देशाचा 11.28% सहभाग आहे.