सिंगापूर फिनटेक फेस्टिवल: भारताची आर्थिक क्रांतीच्या दिशेने वाटचाल- नरेंद्र मोदी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (photo credit-PTI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आसियान-भारत समिटमध्ये सहभागी होण्यासाठी सिंगापूरला रवाना झाले आहेत. सिंगापूरमध्ये त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी फिनटेक फेस्टिवलमध्ये बोलताना मोदी म्हणाले की, आर्थिक समावेश हे आज 1.3 अरब भारतीयांसाठी सत्यात उतरले आहे. आम्ही काही वर्षांत 1.2 अरब लोकांची बायोमेट्रिक ओळख बनवण्यास यशस्वी झालो आहोत. भारतीय तरुणांनी आज जगाला आपल्या तंत्रज्ञानाची ताकद दाखवली आहे. त्याचबरोबर यावेळी मोदींनी आयुष्यमान भारत योजनेबद्दलही सांगितले. या योजनेअंतर्गत 50 कोटी लोकांना मुक्त मेडिकल सुविधा मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापूर दौऱ्यावर ; आसियान समिटमध्ये होणार सहभागी

पुढे मोदी म्हणाले की, भारत हा विविध परिस्थितींचा सामना करणारा देश आहे. 2014 मध्ये आम्ही सत्तेत आल्यावर देशातील लोकांना तंत्रज्ञानाशी जोडण्याचे पहिले काम आम्ही केले आणि त्यात यशस्वी देखील झालो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (13/11/2018) रोजी सिंगापूर दौऱ्यासाठी रवाना झाले. तिथे ते पूर्व एशिया शिखर संमेलन आणि भारत आसियान शिखर बैठकीत सहभागी होतील. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी 14-15 नोव्हेंबरला असलेल्या विविध कार्यक्रमात सहभागी होतील. तसंच या दौऱ्यादरम्यान पीएम मोदी अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या प्रतिनिधींसोबत बैठक करणार आहेत.