पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'सेऊल शांती पुरस्कार' जाहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo Credits : IANS)

दक्षिण कोरिया सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'सेऊल शांती पुरस्कार' देण्याची घोषणा केली आहे. हा पुरस्कार पंतप्रधान मोदींना वैश्विक स्तरावर मानवता आणि शांतीला प्रोत्साहन दिल्याने प्रदान करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय शांती, आर्थिक विकास आणि मानवता या क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याने देण्यात येतो. यापूर्वी नरेंद्र मोदींना  'चॅम्पियन्स ऑफ द अर्थ' या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते. पर्यावरण विषयात सकारात्मक पाऊले उचलल्याने ‘चॅम्पिअन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड’ हा पुरस्कार देण्यात येतो.

'चॅम्पिअन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड' मिळाल्यानंतर 2019 मध्ये मोदींना नोबेल शांती पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. ही मागणी भाजपचे अध्यक्ष तमिलीसा सौंदराजन यांनी केली होती.

सौंदराजन यांनी 'प्रधानमंत्री जन आरोग्‍य योजना-आयुषमान भारत' योजनेसाठी मोदींना नामांकन मिळावे, यासाठी मागणी केली होती. पंतप्रधान मोदींनी या योजनेची सुरुवात 23 सप्टेंबरपासून केली. या योजनेअंतर्गत गरीब, वंचित लोकांना स्वास्थ्य सेवा पुरवण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.