Agriculture Infrastructure Fund अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतक-यांना वित्त सुविधा देण्याची केली घोषणा
PM Narendra Modi (Photo Credits: ANI/Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे Agriculture Infrastructure Fund अंतर्गत एक लाख कोटी रुपये वित्तपोषण सुविधा सुरु करण्याची घोषणा केली. यात PM-KISAN योजनेअंतर्गत विशेष फायदे देण्यात येतील असेही ते यावेळी म्हणाले. यासोबतच पंतप्रधानांनी 8.5 कोटी शेतक-यांच्या खात्यात 17,000 कोटी PM-KISAN योजनेअंतर्गत देण्यात येणार असल्याचे देखील सांगितले. हे टप्प्याटप्याने शेतक-यांच्या खात्यात तात्काळ जमा होईल असेही ते यावेळी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शेतीसाठी युरियाचा अधिकाधिक वापर केला जात असल्याने चिंता व्यक्त केली. यामुळे जमिनीला नुकसान होत असून शेतक-यांनी याविषयी विचार केला पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. Vijayawada Fire: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयवाडा COVID-19 सेंटर मध्ये आगीच्या दुर्घटनेवर ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केले दु:ख; See Tweet

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व शेतक-यांना भगवान बलराम जयंतीच्या शुभेच्छा देत या शुभ दिनी शेतक-यांना एक लाख कोटी रुपये विशेष फंड लाँच केले. मोदी म्हणाले, "यामुळे गावा-गावांत चांगले भंडारण, आधुनिक कोल्ड स्टोरेज ची साखळी बनण्यास मदत होईल. मला आनंद होत आहे की, या योजनेचे जे लक्ष्य आहे, ते साध्य होत आहे."

या योजनेने शेतक-यांना खूप फायदा होईल. त्यासोबतच Agriculture Infrastructure Fund हे आत्मनिर्भर भारत अभियानचा संकल्प आहे ज्याच्यावर आपल्या सर्वांना काम करायचे आहे.