पंजाब: ट्रेन येताच तलावात उडी मारण्याचा तरुणाईचा जीवघेणा स्टंट; पहा व्हिडिओ
लुधियानातील मुलांची स्टंटबाजी (Photo Credits: ANI)

पावसाळ्यात चिंब भिजत मज्जा मस्ती करण्याकडे युवकांचा कल असतो. मात्र ही मज्जा मस्ती करताना स्वतःसोबतच आपल्या मित्रपरिवाराची काळजी घेणे गरजेचे असते. अन्यथा ही मज्जा सजा ठरु शकते. पावसाळ्यातील धमाल मस्ती जीवावर बेतल्याच्या अनेक घटना आपण पाहतो, ऐकतो. त्यामुळे त्यातून थोडासा बोध घेत आपण काळजीपूर्वक मज्जा मस्ती करु शकतो. मात्र पंजाबमधील (Punjab) लुधियाना (Ludhiana) येथून समोर आलेला हा व्हिडिओ चक्रावणारा आहे. ट्रेनच्या पटरीवर उभे राहत ट्रेन येताच सुमारे 8-9 मुले तलावात उड्या घेतात. मुलांचा हा जीवघेणा स्टंट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पहा व्हिडिओ:

या स्टंट करणाऱ्या मुलांना समजावायला गेले असता त्यांनी तेथून पळ काढला. मात्र पुन्हा त्या ठिकाणी असा प्रकार होणार नाही यासाठी आम्ही सतर्क असू, असे पोलिसांनी सांगितले आहे.

नोट:

आम्ही हा व्हिडिओ शेअर करत असलो तरी मात्र आम्ही याचे कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही. हा व्हिडिओ पाहून अशा प्रकारचे स्टंट करु नये, ते जीवावर बेतू शकतात, असे आवाहन लेटेस्टी करत आहे.