पाकिस्तानच्या हेलिकॉप्टरची जम्मू-काश्मिरच्या पुंछमध्ये घुसखोरी, पाहा व्हिडिओ
प्रतिकात्मक फोटो

पाकिस्तानचा भारतावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सतत सुरुच आहे. नियंत्रण रेषेवर गोळीबार केल्यानंतर काश्मीरमध्ये पाकिस्तानी हेलिकॉप्टर भारतीय हवाई क्षेत्रात घुसल्याची खबर समोर आली आहे. वृत्तानुसार, सीमावर्ती राज्य जम्मू काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी हेलिकॉप्टरने हवाई सीमेचे उल्लंघन केले. दोन्ही देशांत ठरलेल्या नियमांनुसार, कोणतेही विमान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या एक किमी जवळ येऊ शकत नाही. तर विनारोटरवाले दुसरे कोणतेही विमान सीमेच्या 10 किमीच्या जवळ येऊ शकत नाही. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ; एक पोलिस अधिकारी शहीद

फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानी सेनेचे एक हेलिकॉप्टर नियमांचे उल्लंघन करुन नियंत्रण रेषेच्या जवळ आले होते. त्यानंतर ते परत फिरले. तेव्हा सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सेनेचे ते हेलिकॉप्टर MI-17 होते.

आज भारतीय हवाई क्षेत्रात घुसलेले पाकिस्तानी हेलिकॉप्टर...

फेब्रुवारीत घुसखोरी केलेल्या हेलिकॉप्टरबद्दल अधिकाऱ्याने सांगितले की, "हेलिकॉप्टर पाकिस्तानच्या सीमेतच होते. पण पाकिस्तानच्या या हालचालीनंतर भारतीय सैनिक सर्तक झाले." त्याचबरोबर त्यांनी हेलिकॉप्टरच्या  दिशेने गोळीबार केला. त्यानंतर मात्र ते हेलिकॉप्टर पाकिस्तानच्या हद्दीत परतले.