Omicron Not Dangerous: फुफ्फुसांवर परिणाम होत नसल्याने आमोयक्रोन तितका घातक नाही; संशोधकांचा अहवाल
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारतासह जगभरातील अनेक देशांची झोप उडवलेला कोरोना व्हायरस (Coronavirus) स्ट्रेन ओमायक्रोन (Omicron) हा म्हणावा तितका धोकादायक (Omicron Not Dangerous) नाही. ओमायक्रोन या कोरोना स्ट्रेनचे फुफ्फुसाला फारसे संक्रमण होत नाही. त्यामुळे या स्ट्रेनचा संसर्ग झाला तरी रुग्णाच्या जीवाला फारसा धोका उद्भवत नसल्याचे निरीक्षण सोशधकांनी एका संशोधन अहवालात मांडले आहे. या संशोधन अहवालाच्या अधारे आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे. न्यूयॉर्ट टाईन्सने दिलेल्या वृत्ताच्या हवाल्याने आयएनएस या वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, उंदीर आणि तत्सम छोट्या प्राण्यांवर केलेल्या एका संशोधनात निष्कर्ष पुढे आला आहे की, हा व्हेरीएंट फुफ्फुसाचे नुकसान कमी करतो. तसेच, या व्हेरीएंटचा सर्वाधिक प्रभाव हा केवळ नाक, श्वास आणि गळ्यापर्यंतच राहतो.

ओमायक्रोनच्या तुलनेत कोरोना व्हायरस विषाणूचा विचार करता हा विषाणू रुग्णाच्या थेट फुफ्फुसावरच प्रहार करतो. त्यामुळे रुग्णाला श्वास घेण्यास मोठी अडचण निर्माण होते. यात व्यक्ती दगावण्याची शक्यता वाढते. इजरायल टाइम्सने नूयॉर्क टाईम्सच्या हवाल्याने म्हटले आहे की, ओमायक्रोन हा नागरिकांच्या केवळ वरच्या भागात संक्रमित होतो. तो फुफ्फुसाला अधिक धक्का पोहोचवत नाही. त्यामुळे कोरोना व्हायरस संसर्गाच्या तुलनेत हा काहीसा कमी घातक ठरतो.

बर्लिन इन्स्टीय्यूट ऑफ हेल्थच्या जीव वैज्ञानिक रोनाल्ड इल्स यांनी म्हटले आहे की, हा व्हेरिएंट सक्रमिताच्या श्वासनलीकेस प्रभावित करतो . एका संशोधनात असेही म्हटले आहे की, रुग्णाच्या फुफ्फुसात होणारा इतर कोणत्याही व्हेरीएंटच्या तुलनेत ओमिक्रोन संसर्ग केवळ 10% हिस्सा इतक्या कमी प्रमाणात आढळून आला आहे. (हेही वाचा, COVID-19 Updates In India: वाढत्या ओमायक्रोन संसर्गामुळे देशासमोर नवे आव्हान, 23 राज्यांत 1431 रुग्ण, महाराष्ट्रात सर्वाधिक 454 जण संक्रमित)

दरम्यान, या आधी इतर अनेक संशोधनांमध्ये म्हटले आहे की, आमायक्रोन कोरना च्या डेल्या विषाणुच्या तुलनेत म्हणावा तितका घातक नाही. ओमायक्रोन हा पहिल्यांदा दक्षिण अफ्रीका आणि बोत्सवानामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या काही आठवड्यांत आढळून आला. हळूहळू तो दक्षिण अफ्रिका आणि मग इतर देशांमध्ये पसरला.

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटल्यानुसार आतापर्यंत ओमायक्रोन हा स्ट्रेन जगभरातील 100 देशांमध्ये आढळून आला आहे. हा जगभरातील एकूण अभ्यास विचारात घेता ओमायक्रोन संसर्गामुळे रुग्णाचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण बरेच कमी आहे. भारतात सध्यास्थिती ओमायक्रोनचे रुग्ण 1,431 इतके झाले आहेत.