धक्कादायक! 62 वर्षीय वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Latestly/Illustration)

नवी दिल्ली (New Delhi) येथे एका 62 वर्षीय वृद्धाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी वृद्धाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

गाझियाबाद (Ghaziabad) येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचे घरातील मंडळींशी भांडण झाल्याने रागात घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती गाझियाबाद येथील रेल्वेस्थाकावर पोहचून एकटीच रडत बसली. त्यावेळी तेथे आरोपी वृद्ध येऊन तिला का रडत असल्याची विचारपूस करु लागला. त्यानंतर त्याने पीडित मुलीला दिल्लीला जाण्यासाठी विचारले. पीडिता आधी या वृद्धाला नाही म्हणाली. परंतु दिल्लीला राजी केल्यानंतर त्या दोघांनी एका हॉटेलमध्ये विश्रांतीसाठी रुम घेतली. त्याचवेळी वृद्धाने पीडित मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तिला तो एका जवळच्या प्राणिसंग्रहालयात घेऊन जाण्याचे नाटक करत तेथून पळ काढला.

या प्रकरणी पीडित मुलीने वृद्धाचा शोध काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तो कुठे दिसत नसल्याने तिने पोलीस स्थानक गाठले. त्यावेळी मुलीने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तातडीने दिल्लीतील हॉटेलमध्ये जाऊन वृद्धाची चौकशी केली. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी वृद्धाची ओळख पटली. यानंतर पोलिसांनी वृद्धाची माहिती काढून त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.