आयसिसशी संबंध आढळून आल्याने केरळच्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल
प्रतीकात्मक फोटो (Photo Credits: ANI)

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) केरळ (Kerala) येथील 7 ते 8 तरुणांविरोधात आयसिसशी( ISIS) संबंध असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दहशतवादी कृत्यात या तरुणांचा सहभाग असल्याचे स्पष्ट केले जात आहे. मात्र केरळमधील तरुण हे कतार आणि सिरिया येथे जात असल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेला  मिळाली होती. परंतु त्यांच्याजवळ ठोस पुरावे नसल्या कारणाने अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती.

दहशतवादी संघटना झुंड-अल-अक्सा आणि जभात अल-नुसराहला या दोन संघटनांमध्ये सहभागी असणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर बुधवारी (9 जानेवारी) एनएआयने कोच्ची येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर भारतीय दंडविधान कलम 16 आणि 18 अंतर्गत तरुणांवर कारवाई करण्यात येणार आहे.

केरळातील तरुण कतार आणि सिरियात जात असल्याची माहिती 2013 पासून एनआयला मिळत होती. तर युवकांनी पूर्ण तयारीनिशी दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याचे सांगितले जात आहे.