Naxalites Kill Anganwadi Worker: छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांची दहशत! विजापूरमध्ये अंगणवाडी सेविकेची कुटुंबासमोर गळा दाबून हत्या
ही घटना बासागुडा पोलीस स्टेशन हद्दीतील तिमापूर गावात शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही अज्ञात नक्षलवाद्यांनी गावातील लक्ष्मी पदम यांच्या घरात घुसून तिची कुटुंबासमोर गळा आवळून हत्या केली.
Naxalites Kill Anganwadi Worker: छत्तीसगड (Chhattisgarh) मधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. नक्षलग्रस्त विजापूर जिल्ह्यात (Bijapur District) नक्षलवाद्यांनी एका अंगणवाडी सहायक (Anganwadi Worker) महिलेची हत्या (Murder) केली आहे. या संदर्भात पोलिसांनी आज म्हणजेच शनिवारी सांगितले की, ही घटना बासागुडा पोलीस स्टेशन हद्दीतील तिमापूर गावात शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही अज्ञात नक्षलवाद्यांनी गावातील लक्ष्मी पदम यांच्या घरात घुसून तिची कुटुंबासमोर गळा आवळून हत्या केली. एवढेच नाही तर हत्येनंतर नक्षलवादी त्याचा मृतदेह अंगणात टाकून पळून गेले.
प्राप्त माहितीनुसार, लक्ष्मीचे पती जगदीश पदम यांचे आधीच निधन झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. घटनास्थळी पोलिसांना एरिया कमिटीने नक्षलवाद्यांच्या समर्थनार्थ जारी केलेले एक पत्रक सापडले ज्यामध्ये लक्ष्मीवर एक गुप्तचर असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून हत्या करणाऱ्या नक्षलवाद्यांचा शोध सुरू केला आहे. (हेही वाचा -Delhi Crime News: शौचालयात पाणी टाकण्यावरुन वाद, शेजाऱ्याची भोसकून हत्या; व्यावसायिकाला घातल्या गोळ्या, दिल्ली हादरली
दोन माजी सरपंचांचे अपहरण करून हत्या -
तत्पूर्वी बुधवारी विजापूर जिल्ह्यातील नक्षलवाद्यांनी दोन माजी सरपंचांचे अपहरण करून पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून त्यांची हत्या केली होती. पोलिसांनी या प्रकरणी सांगितले होते की, जिल्ह्यातील नैमेद आणि भैरमगड पोलीस स्टेशन परिसरात संशयित माओवाद्यांनी माजी सरपंच सुखराम अवलम आणि सुकालू फरसा यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली. सुखराम हे नायमेद पोलीस स्टेशन हद्दीतील कादेर गावचे रहिवासी होते आणि फरसा हे भैरमगड पोलीस स्टेशन हद्दीतील बिर्याभूमी गावचे रहिवासी होते. (हेही वाचा, Triple Murder in South Delhi: दक्षिण दिल्ली येथे तिहेरी हत्याकांड; आई, वडील आणि मुलीचा मृत्यू; नेब सराय येथील घटना)
कादेर गावचे माजी सरपंच अवलम हे विजापूरच्या शांतीनगरमध्ये राहत होते. बुधवारी ते कादर या गावी शेतीच्या कामासाठी गेले होते. तेथून ते कादर या गावी परतत असताना सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात इसम तेथे आले आणि त्यांनी सुखरामला जंगलाच्या दिशेने नेले. रात्री नऊच्या सुमारास सुखरामचा खून करून मृतदेह कादर-कैका रस्त्यावर फेकून दिला. घटनास्थळावरून माओवाद्यांच्या गांगलूर एरिया कमिटीने जारी केलेले एक पत्रक जप्त करण्यात आले आहे.
तथापी, यापूर्वी सोमवारी माओवाद्यांनी माजी सरपंच सुकालू फरसा यांचे बिर्याभूमी गावाच्या वाटेवर अपहरण केले होते. यानंतर कुटुंबीय आणि मुलगी यामिनी फरसा यांनी सोशल मीडियावर वडिलांना सोडण्याचे आवाहन केले होते. मात्र नंतर फार्साचा मृतदेह सापडला. घटनास्थळावरून माओवाद्यांचे एक पत्रक जप्त करण्यात आले आहे ज्यामध्ये माओवाद्यांनी फार्सावर भाजपमध्ये प्रवेश केल्याचा आरोप केला होता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)