'मन की बात' मधून मोदींचा पाकला इशारा ; शांतीचा भंग केल्यास मिळेल सडेतोड उत्तर
पीएम मोदी आणि इमरान खान (Photo Credit-IANS/PTI)

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या पाकिस्तानसोबतच्या लढ्यात अनेक जवान शहीद झाले आहेत. यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात' या कार्यक्रमात भाष्य केले आहे. मोदीजी म्हणाले की, "जे आमच्या राष्ट्रात शांती आणि प्रगतीचा भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना आपले सैनिक तोडीस तोड उत्तर देतील." जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ; एक पोलिस अधिकारी शहीद

मोदी पुढे म्हणाले की, "आम्ही शांतीवर विश्वास ठेवतो आणि शांततेलाच प्रेरणा देतो. पण राष्ट्राचा सन्मानाशी आणि जवानांच्या बलिदानासोबत कोणतीही तडजोड करणार नाही."

मोदींनी सांगितले की, "भारत नेहमी शांतीच्या मार्गाने चालत आला आहे. 20 व्या दशकातील दोन विश्वयुद्धात भारतातील एक लाखांहून अधिक सैनिकांनी शांतीसाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. आमची नजर कधी दुसऱ्या धरतीवर नव्हती. आम्ही शांततेप्रती वचनबद्ध आहोत."

सैन्याच्या योगदानाबद्दल बोलताना मोदींनी सांगितले की, "सशस्त्र बळावर आणि भारतीय सैनिकांबद्दल अभिमान नसेल अशी व्यक्ती भारतात असणे दुर्मिळच. प्रत्येक भारतीय मग तो कोणत्याही जाती, धर्म, पंथ किंवा भाषेचा असो तो सैनिकांप्रती आपले समर्थन देण्यासाठी तत्पर असेल."

मोदी पुढे म्हणाले की, "वेगवेगळ्या स्थळांवर सशस्त्र बळांनी आपल्या ताकदीचे प्रदर्शन केले. त्यामुळे अधिकाधिक देशातील नागरिक, विशेष करुन तरुण पीढीला सैन्याच्या ताकदीचा अंदाज येईल. त्याचबरोबर आपण किती सक्षम आहोत किंवा आपले सैनिक किती जोखीम पत्करुन देशाचे रक्षण करतात हे ही त्यांना कळेल."