Kota Kidnapping Case Update: मध्य प्रदेशातील  NEET च्या विद्यार्थिनीने रचला अपहरणाचा बनाव; वडिलांकडे मागितले सुटकेसाठी 30 लाख
Screenshot of the video (Photo Credit- X/@radhika8057)

राजस्थानच्या कोटा मध्ये एका NEET च्या, मूळच्या मध्य प्रदेशातील शिवपुरी  एका विद्यार्थिनीने चक्क अपहरणाचा बनाव कडून वडीलांकडून 30 लाख रूपये उकळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या मुलीला मित्रांसोबत परदेशी फिरायला जायचं होतं. त्यासाठी तिने ही पैशाची मागणी केली होती. Kota SP Amrita Duhan यांनी ही माहिती दिली आहे. पोलिसांच्या तपासामध्ये ही बाब अपहरणाची नसल्याचं समोर आलं आहे.

Amrita Duhan यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाहेर फिरायला जाण्याच्या पैशाची जमवाजमव करण्यासाठी हा बनाव रचला होता. मुलीला इंदौर मध्ये एका रूममध्ये बंदी करून ठेवल्याचा फोटो तिच्या वडिलांना पाठवण्यात आला होता. मुलीची सुटका करायची असेल तर 30 लाख द्या अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान या अपहरण झालेल्या मुलीच्या मित्रांची चौकशी झाली तेव्हा खरा प्रकार समोर आला. मित्र इंदौरचा रहिवासी होता. मंगळवार रात्रीपर्यंत मुलगी इंदौर मध्येच होती असं सांगण्यात आलं होतं.

पहा ट्वीट

मुलीचे हात-पाय बांधलेल्या अवस्थेमध्ये तिचा फोटो काढण्यात आला होता. या मुलीला तिच्या दोन मित्रांसोबत परदेशात फिरायला जायचे होते. तिला शिक्षणामध्ये काही रस नव्हता त्यामुळे तिने हा बनाव रचला होता. तसेच कोटा मध्ये या मुलीचे शिक्षणासाठी अ‍ॅड्मिशन झाले नव्हते. दरम्यान पोलिसांनी या मुलीला आणि तिच्या मित्रांना तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.