मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या (Manipur Violence) वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू आणि सुरक्षा कर्मचार्यांसह सहा जण जखमी झाले आहेत, तर बिष्णुपूरमध्ये हल्लेखोरांनी सहा घरे जाळली. पोलिसांनी शुक्रवारी रात्री ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोरांनी फौगाकचाओ इखाई, हेकोले, तेराखोंसांगबी (बिष्णुपूर) आणि कांगवाई (चरचंदपूर) भागात गोळीबार केला, ज्यात एक नागरिक ठार झाला आणि दोन सुरक्षा कर्मचार्यांसह सहा जण जखमी झाले. ( Opposition INDIA MPs Visit Manipur: मणिपूरला भेट देणार I.N.D.I.A युतीचे शिष्टमंडळ; 16 पक्षांच्या 20 खासदारांचा समावेश)
दरम्यान, हेकोले आणि फौगाकचाओ इखाई भागात मंगळवारी सशस्त्र हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारानंतर एका गावकऱ्याचा शेपेलच्या जखमांमुळे मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हल्लेखोरांनी बिष्णुपूरमधील फौगकचाओ इखाई मानिंग लीकई येथील सहा घरेही जाळली. केंद्रीय दले आणि पोलीस हिंसाचारग्रस्त भागात पोहोचले आहेत आणि हल्लेखोरांना प्रत्युत्तर देत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
मणिपूर गेल्या 94 दिवसांपासून धुमसत आहे. खरं तर, 3 मे पासून, मेईटेई (खोऱ्यातील वर्चस्व असलेला समुदाय) आणि कुकी जमाती (डोंगरावर वर्चस्व असलेला समुदाय) यांच्यात रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. वास्तविक मेईती समाज स्वत:साठी एसटीचा दर्जा मागत असून कुकी समाज त्याला विरोध करत आहे. या हिंसाचारात आतापर्यंत सुमारे 140 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 400 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. नुकतेच दोन कुकी महिलांना विवस्त्र करून त्यांची रस्त्यावर परेड केल्याची घटना समोर आली होती, त्यानंतर तेथील वातावरण अधिकच चिघळले आहे.