Manipur Landslide (संग्रहित संपादित प्रतिमा)

मणिपूरच्या (Manipur) नोनी जिल्ह्यात जिरीबाम-इम्फाळ रेल्वे मार्गाजवळ प्रचंड भूस्खलन (Landslide) झाले आहे. येथून जवळच लष्कराची प्रादेशिक छावणी आहे. भूस्खलनामुळे आतापर्यंत किमान 7 जणांचा मृत्यू झाला असून 45 हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 19 जणांना वाचवण्यात यश आले आहे. जखमींवर नोनी आर्मी मेडिकल युनिटमध्ये उपचार सुरू आहेत, जिथे गंभीर जखमी व्यक्तींना वाचवण्याचे काम जोरात सुरू आहे.

इंफाळ फ्री प्रेसनुसार, मृतांची ओळख भारतीय लष्कराचे 107 टेरिटोरियल आर्मी कर्मचारी म्हणून झाली आहे. हे लोक मणिपूरच्या नोनी जिल्ह्यातील तुपुल रेल्वे स्थानकाजवळ जिरीबाम ते इम्फाळपर्यंतच्या बांधकामाधीन रेल्वे मार्गाचे रक्षण करण्यासाठी तैनात होते. नॉर्दर्न फ्रंटियर रेल्वे सीपीआरओने अपघाताबाबत एक निवेदन जारी केले आहे.

संततधार पावसामुळे जिरीबाम-इम्फाळ नवीन लाईन प्रकल्पाच्या तुपुल स्टेशनच्या इमारतीला मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरड कोसळल्याने ट्रॅकचे बांधकाम आणि कामगार छावणीचेही नुकसान झाले आहे. वृत्तानुसार, मोठ्या प्रमाणावर भूस्खलनामुळे इजेई नदी पूर्णपणे बंद झाली आहे. दरम्यान, पीआयबी डिफेन्स विंगने एका निवेदनात म्हटले आहे की, भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सच्या जवानांकडून मोठ्या प्रमाणावर बचाव मोहीम सुरू आहे. घटनास्थळावरील इंजिनीअर प्लांट उपकरणे बचाव कार्यात लावण्यात आली आहेत.

वृत्तानुसार, मोठ्या प्रमाणावर भूस्खलनामुळे इजेई नदी पूर्णपणे बंद झाली आहे. दरम्यान, पीआयबी डिफेन्स विंगने एका निवेदनात म्हटले आहे की, भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सच्या जवानांकडून मोठ्या प्रमाणावर बचाव मोहीम सुरू आहे. घटनास्थळावरील इंजिनीअर प्लांट उपकरणे बचाव कार्यात लावण्यात आली आहेत. लष्कराचे हेलिकॉप्टर बचावासाठी सज्ज आहेत. हे सर्व हवामान स्वच्छ होण्याची वाट पाहत आहेत. (हेही वाचा: Maharashtra Weather Forecast: संपूर्ण कोकणाला 24 तासांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता)

दरम्यान, आसाम आणि मणिपूरसह अनेक ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. याठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून, परिसरातील जनजीवन विस्कळीत होत आहे. आसाममध्ये 10 दिवसांत आतापर्यंत 135 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील 32 जिल्ह्यांतील 5424 गावे पुराच्या विळख्यात आहेत व यामुळे लाखो लोक प्रभावित झाले आहेत. त्यांना घरे सोडून मदत छावण्यांमध्ये किंवा महामार्गावर तंबू टाकून राहावे लागत आहे.