प्रेयसीने नवऱ्याचे घर सोडून जाण्यासाठी नकार दिल्याने प्रियकराकडून हत्या
Murder | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

विवाहीत प्रेयसीने नवऱ्याच्या घरातून प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी नकार दिल्याने तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घटना घडली आहे. या प्रकरणी धक्कादायक घटना म्हणजे विवाहित प्रेयसीच्या चार वर्षाच्या मुलासमोर तिची हत्या करण्यात आली आहे.

पिंकी चौहान असे तरुणीचे नाव आहे. पिंकीने पाच वर्षापूर्वी तिच्या पसंदीने एका तरुणासोबत लग्न केले. मात्र नवऱ्याची परिस्थिती सर्वसाधारण असल्याने तिने एक ब्युटी पार्लरमध्ये काम करमण्यास सुरुवात केली. तेव्हा सनी नावाच्या एका व्यक्तीसोबत तिची चांगली मैत्री झाली. या मैत्रीचे रुपतांर काही काळाने प्रेमात झाले. या दोघांबद्दल पिंकी हिच्या नवऱ्याला कळल्याने त्याने दिल्लीमधून दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी गेले.

तसेच नवऱ्याने दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी गेले असता तिला घरातील कामे आणि कुटुंबाचा संभाळ करण्यास सांगितले. मात्र ही गोष्ट पिंकी हिच्या प्रियकराला आवडत नसल्याचे त्याने सांगितले. तसेच पिंकी हिने नंतर प्रियकराला भेटण्यासाठी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रियकराने ति्च्या घरी जाऊन पिंकी हिची गळा चिरुन हत्या केली.