Maharashtra Political Crisis: खासदार श्रीकांत शिंदे यांचे उल्हासगनर येथील कार्यालय फोडले; शिवसेनेतील बंडखोरीनंतर कार्यकर्त्यांची जोरदार प्रतिक्रिया
Shrikant Shinde | (Photo Credits: Facebook)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे शिवसैनिक जोरदार आक्रमक झाले आहेत. राज्यभरात हे शिवसैनिक बंडखोरांविरोधात आंदोलन करत आहेत. या आक्रमक शिवसैनिकांनी कल्याणचे शिवसेना (Shiv Sena) खासदार आणि एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या उल्हासनगर येथील कार्यालयाची तोडफोड केली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी उपस्थिती दर्शवत आक्रमक कार्यकर्त्यांना बाजूला केले. पोलिसांनी घटनेची दखल घेऊन पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर शिवसेना आमदारांनी बंड केले आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या दाव्यानुसार शिवसेनेचे 40 आमदार त्यांच्यासोबत आहेत. दरम्यान, श्रीकांत ठाकरे हे एकनाथ शिंदे यांचेच पूत्र आहेत. त्यांनीही शिवसेनेत बंड केले आहे. अद्याप तरी श्रींकांत शिंदे यांची कोणतीही प्रतिक्रिया पुढे आली नसली तरी, उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांमध्ये मोठा असंतोश आहे. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: शिवसेनेच्या 16 बंडखोरांना अपात्रतेची नोटीस)

दरम्यान, आक्रमक शिवसैनिकांनी पुणे येथे आमदार तानाजी सावंत यांचे कार्यालय फोडले. पुण्यातही शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर आक्रमक आहेत. राज्यभरात विविध ठिकाणी शिवसैनिक निर्शने करत आहे. मुंबईतही आमदार सदा सरवणकर यांच्या पोस्टरला काळे फासण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला आमदार कुडाळकर यांच्याही कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे.