Madhya Pradesh: धक्कादायक! कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाला तरीही दोनदा जीव गेल्याचे रुग्णालयाकडून घोषित केल्याचा घरातल्यांचा आरोप
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एका 58 वर्षीय कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाला असला तरीही त्याला रुग्णालयाकडून दोन वेळा मृत घोषित करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एका 58 वर्षीय कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाला असला तरीही त्याला रुग्णालयाकडून दोन वेळा मृत घोषित करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. घटना विदिशा जिल्ह्यात घडली असून रुग्णांच्या घरातल्यांनी हा आरोप केला आहे. रुग्णालयातील व्यवस्थापकांनी यामध्ये नर्सची चुकी दाखवली. मात्र व्यक्तीचा एकदाच मृत्यू झाला आहे. गोरालाल कोरी असे रुग्णाचे नाव असून ते रेल्वेत कार्यरत होते. सुलतानिया येथील रहिवाशी असलेले कोरी हे अटल बिहारी वाजपेयी मेडिल कॉलेज अॅन्ड हॉस्पिटल मध्ये 12 एप्रिलला कोरोनाची लक्ष दिसून येत असल्याने उपचारासाठी दाखल झाले होते. याबद्दल कोरी यांच्या मुलाने हे सांगितले आहे. मात्र दुसऱ्या दिवशी जवळपास मध्यरात्री 2.30 वाजताच्या सुमारास हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी त्याला फोनवरुन गोरला यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. तसेच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले जात असल्याची ही माहिती त्याला दिली.
त्याच दिवशी (एप्रिल 13) दुपारी 3 वाजता पुन्हा एकदा फोन आला आणि तेव्हा वडिलांची प्रकृती अधिकच गंभीर असल्याचे सांगण्यात आले. ज्यावेळी तातडीने रुग्णालयात धाव घेतली तेव्हा नर्सने त्यांना आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही असे म्हटले. मात्र दुसऱ्या नर्सने मात्र त्याला वडील जीवंत असल्याचे म्हटले आणि फक्त त्यांना श्वास घेण्यास त्रास होतोय असे सांगितले.(Weekend Curfew in Delhi: दिल्लीत विकेंड कर्फ्यू लागू; शुक्रवारी रात्री ते सोमवारी सकाळी राहणार 'हे' निर्बंध)
Tweet:
जवळपास 5 वाजताच्या सुमारास सांगण्यात आले की त्यांना श्वास घेण्यासंदर्भातील काही प्रक्रिया करावी लागेल. तर संध्याकाळी पुन्हा फोन आला तेव्हा वडिलांचा त्या प्रक्रियेत मृत्यू झाल्याचे कळवण्यात आले. त्यावेळी मात्र रुग्णालयात पोहचलो असता त्यांना वडिलांना कोरोना झाला असल्याने त्यांचा मृतदेह देऊ शकत नाही असे व्यवस्थापकांनी कोरी यांचा मुलगा कैलाश याला म्हटले.
मात्र दुसऱ्या दिवशी वडिलांचे त्यांनी मृत्यूपत्र दिले परंतु भावाला त्यांचा मृतदेह पहायचा होता. ज्यावेळी भावाला वडिलांचा मृतदेह दाखवला तेव्हा तो दुसराच व्यक्ती होता. तेव्हा भाऊ वॉर्डमध्ये गेला आणि वडिलांचा शोध घेऊ लागला तेव्हा त्याला ते व्हेंटिलेटरवर असल्याचे त्याने म्हटले. तेव्हा रुग्णालयाने त्यांना देण्यात आलेले मृत्यूपत्र मागे घेतले आणि कोरी परिवारातील सर्वजण घरी परतले.(Oxygen Plant Under PM-CARES Fund: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पीएम केयर्स फंडमधून 100 नवीन रुग्णालयांमध्ये उभारण्यात येणार ऑक्सिजन प्लांट)
पण संध्याकाळी त्यांना गोरालाल यांचा अखेर मृत्यू झाल्याचे कळवण्यात आले. तेव्हा दु:खद बातमी सत्य झाली. याबद्दल रुग्णालयाचे डीन डॉ. सुनील नंदेश्वर यांन विचारले असता त्यांनी असे म्हटले की, गोरालाल यांना ज्यावेळी व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले तेव्हा त्यांच्या हृदयाचे ठोके थांबले गेले होते. पण त्यांना जीवंत करण्यात आले. त्याचदरम्यान नर्सने त्या परिस्थितीचा चुकीचा अर्थ काढला आणि अयोग्य माहिती दिली. यामध्ये फक्त आमची चुक दाखवली जात आहे. परंतु त्यांना वाचवण्यासाठी आम्ही तासभर प्रयत्न केला त्याबद्द्ल कोणीही बोलत नसल्याचे डॉ. नंदेश्वर यांनी म्हटले आहे.