Lockdown मुळे घरात एकट्या असणाऱ्या अंध महिलेवर बलात्कार; अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

कोरोनामुळे (Coronavirus) देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आले आहे. याकाळात अनेक ठिकाणी गुन्ह्यांचे प्रमाण घटल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र आता मध्य प्रदेशात घडलेला एक प्रसंग या समाधानाला अपवाद ठरत आहे. लॉक डाऊनमुळे घरात एकट्याच असणाऱ्या एका 53 वर्षीय अंध महिलेवर बलात्कार (Rape)  करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ (Bhopal) मध्ये ही घटना घडली आहे. संबंधित महिला ही विवाहित असून भोपाळ मधील एका बँकेत मॅनेजरपदी काम करते. लॉक डाऊन पूर्वी या महिलेचा पती राजस्थानमधील (Rajasthan) सिरोही (Sirohi) या त्यांच्या मूळगावी गेला होता, मात्र आता लॉक डाऊन मुळे तो तिथेच अडकून पडला आहे परिणामी ही महिला घरात एकटीच राहत होती. याच गोष्टीचा फायदा घेऊन काही अज्ञातांनी या अंध महिलेवर घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. या अज्ञात आरोपींच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, झोपेत असताना एक अज्ञात व्यक्ती घरात घुसला आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला असे पोलिसांना महिलेने सांगितले आहे. आरोपीने दुसऱ्या माळ्यावर पोहोचण्यासाठी पायऱ्यांचा वापर केला असावा आणि यानंतर बाल्कनीतून घरात प्रवेश केला असण्याची शक्यता आहे अशी माहिती पोलीस अधिकारी संजय साहू यांनी दिली आहे. अहमदनगर: बलात्काराची भीती दाखवत आदिवासी महिलेच्या घरी चोरांचा डल्ला; पोलीस तपास सुरु

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे पोहोचून पाहणी केली. पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास केला जाणार आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अद्याप कोणताही ठोस पुरावा हाती लागलेला नाही.