लखनौ: अल्पवयीन मुलीचा गावाच्या हद्दीत लिलाव, बोली लावण्यासाठी तरुणांपासून वृद्धांपर्यंत उपस्थिती
Representational Image | (Photo Credits: PTI)

लखनौ येथे एका अल्पवयीन मुलीचा गावाच्या हद्दीत लिलाव करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लिलावाच्या वेळी पीडित मुलीवर बोली लावण्यासाठी तरुणांपासून ते वृद्धांनी उपस्थिती लावली होती. मात्र अल्पवयीन मुलीचा लिलाव करणे ही कायद्याच्या विरोधात असून तिच्यासोबत गैरवर्तवणूक सुद्धा करण्यात येत होती. सदर मुलगी वारंवार तेथील जमलेल्यांना विनवणी करत होती तरी सुद्धा तिच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते.

पीडित मुलीला लिलाव सुरु असल्याची बातमी पोलिसांना कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आई- वर्षभरापूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर तिच्या सावत्र आईने तिला एका महिलेला 50 हजार रुपयांना विकले होते. ज्या महिलेला मुलीला विकले तिने लिलावाची गोष्ट गावात पसवरली. त्यानंतर मुलीच्या लिलावेळी बोली लावण्यासाठी गावातील लोकांची झुंबड आली होती. मुलीवर एका व्यक्तीने 80 हजार रुपयांची बोली लावली. या प्रकरणी 2 महिला आणि 7 पुरुषांना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून 12 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. तसेच पीडित मुलीची सुटका केली आहे. मात्र आरोपींनी आतापर्यंत झारखंड येथील विविध भागातील मुली जवळजवळ 50 हजार रुपयांना खरेदी करत लाखो रुपयांना विकल्या असल्याची कबुली दिली आहे.(धक्कादायक! इयता सातवीतील विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार; पिडीता गरोदर, आरोपी फरार)

Kedarnath Flood : वर्षे ती जगत होती विधवेचं आयुष्य, अचानक आला पतीचा VIDEO CALL Watch Video

काही दिवसांपूर्वी हिसार येथे एका सरकारी शाळेत, तीन विद्यार्थिनींनी आपल्यावर झालेल्या लैंगिक छळाचे अनेक खळबळजनक खुलासे केले. या शाळेतील मुलींवर चक्क शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केले आहेत. याबाबत शाळेतील तब्बल 40 विद्यार्थ्यांनी बाल संरक्षण युनिटला निवेदन दिले. आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले होते की, सहा महिन्यांपूर्वी वर्गातील एका मुलीचा शिक्षकांनी लैंगिक छळ केला. हा प्रकार सतत सुरु होता, त्यामुळे या छळाला कंटाळलेल्या मुलीने चक्क विष खाल्ले असल्याचा प्रकार समोर आला होता.