लखनौमधील (Lucknow Crime) हॉटेल शरणजीत (Hotel Sharanjit Murder) मध्ये 24 वर्षीय व्यक्तीने भूमाफिया आणि शेजाऱ्यांकडून होणाऱ्या छळाचे कारण देत आपली आई आणि चार बहिणींची हत्या केली आहे. अर्शत असे नाव असलेल्या या तरुणाने हत्येनंतर लगेचच एक व्हिडिओ बनवीला आणि आपल्या कृत्याची कबुली दिली. भूमाफिया (Lucknow Land Mafia) आणि शेजाऱ्यांकडून सातत्याने मिळत असलेल्या धमक्या हेच या हत्येपाठिमागचे कारण असल्याचेही त्याने म्हटले आहे. या प्रकारानंतर संपूर्ण लखनऊ शहरामध्ये खळबळ उडाली आहे.
व्हिडिओमध्ये धक्कादायक खुलासा
आर्शद याने चित्रीत केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, भूमाफिया आणि त्याच्या गावी बुडौनमधील शेजाऱ्यांनी जबरदस्तीने त्याची मालमत्ता ताब्यात घेतली. त्याच्या बहिणीला त्रास दिला. हा त्रास सहन न झाल्याने, मी माझी आई आणि तीन बहिणींना मारले; चौथी मरणार आहे, असे त्याने म्हटले. तसेच, त्याने त्याच व्हिडिओत पाठिमागे पडलेले मृतदेहसुद्धा त्याने दाखवले. अर्शदने दावा केला की त्याने वडिलांच्या मदतीने पीडितेचा गळा दाबला आणि त्यांचे मनगट कापले. (हेही वाचा, Delhi Cafe Owner Dies by Suicide: घटस्फोट आणि पत्नीसोबत वाद; दिल्ली येथील Woodbox Cafe सह-मालकाचा मृत्यू, आत्महत्या केल्याचे वृत्त)
मृतांची नावे
- अस्मा: आई)
- आलिया: बहीण, वय-9 वर्षे
- अल्शिया: बहीण, वय 19 वर्षे
- रहमीन: बहीण, वय 18 वर्षे
आम्हाला न्याय हवा होता, पण कोणी ऐकले नाही
अरशदचा आरोप आहे की, घरातून बाहेर काढल्यानंतर त्याचे कुटुंब 15 दिवसांपासून थंडीत रस्त्यावर राहात होते. छळामुळे आमच्या कुटुंबाने हे पाऊल उचलले आहे. आम्ही मदत मागितली, पण आमचे कोणीही ऐकले नाही. त्यांनी आम्हाला बांगलादेशी म्हटले, त्यांच्या कृतीचे समर्थन करण्यासाठी त्यांनी खोटे पसरवले, असेही तो म्हणाला. पुढे त्याने रानू, आफताब, अलीम खान, सलीम, आरिफ, अहमद आणि अझहर यांच्यासह कुटुंबाच्या दुर्दशेसाठी असलेल्या अनेकांना जबाबदार धरले आहे. हे सर्वजन भमाफीया असल्याचा त्याचा दावा आहे. (हेही वाचा, Communal Riots: यंदा भारतात जातीय दंगलींमध्ये 84% वाढ; महाराष्ट्रात सर्वाधिक, राज्यात 13 लोकांचा मृत्यू)
न्याय आणि धर्मांतरासाठी आवाहन
अर्शद याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अवाहन करत एक संदेशही पाठवला आहे. ज्यात त्याने आरोप केलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे. कुटुंबाने शांततेत राहण्यासाठी धर्म परिवर्तन करण्याचा विचार केला होता, असा खुलासाही त्यांनी केला. अर्शदने त्यांच्या जमिनीवर मंदिर बांधावे आणि त्यांचे सामान अनाथाश्रमाला दान करावे अशी इच्छा व्यक्त करून व्हिडिओचा शेवट केला.
मानसिक आरोग्य आणि समर्थन
हे प्रकरण निराकरण न झालेले विवाद आणि मानसिक त्रास यांच्या विनाशकारी परिणामांवर प्रकाश टाकते. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला मदतीची आवश्यकता असल्यास, कृपया मानसिक आरोग्य विशेषज्ञ किंवा हेल्पलाइनशी संपर्क साधा. हा संपर्क क्रमांख खालील प्रमाणे:
वांद्रेवाला फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ: 9999666555 किंवा help@vandrevalafoundation.com
TISS iCall: 022-25521111 (सोमवार-शनिवार: सकाळी 8 ते रात्री 10)
पोलिसांचा तपास सुरू
लखनौमधील हॉटेल शरणजीत येथे ही भीषण हत्या झाली. पोलिस उपायुक्त रवीना त्यागी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला घटनास्थळी अटक करण्यात आली. फॉरेन्सिक पथकांनी पुरावे गोळा केले असून, तपास सुरू आहे. मीडिया आउटलेट्सद्वारे प्रसारीत व्हिडिओची सत्यता अद्याप पडताळली गेली नाही.