पिवळ्या रंगातील साडीमधील पोलिंग ऑफिसरचे फोटो व्हायरल, सोशल मीडियात तुफान चर्चा
Polling officer (Photo Credits-Facebook)

देशात सध्या लोकसभा निवडणूकीचे (Lok Sabha Elections) वातावरण आहे. परंतु सोशल मीडियात एक वेगळीच चर्चा सुरु असून पिवळ्या रंगाच्या साडीतील पोलिंग ऑफिसरचे फोटो व्हायरल झाले आहेत. यामुळे या ऑफिर्स महिलेची तुफान चर्चा सर्वत्र होत आहे.

नलिनी सिंह असे या पोलिंग ऑफिसर्सचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हे खोटे असल्याचा दावा केला जात आहे. परंतु फेसबुकवर मिसेस जयपूर राहिलेली आहे. तर मतदान निवडणूकीच्या ड्युटीवेळी त्या कुमावत स्कूल मध्ये असल्याचे बोलले जात आहे. तसेच या महिला असलेल्या पोलिंग बूथवर शंभर टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे.(INS Sumitra वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कॅनडाचा पासपोर्टधारी अभिनेता Akshay Kumar याच्यासोबत मेजवानी)

या महिला अधिकाऱ्याच्या फोटोला हजारोंचे लाईक्स मिळाल्यानंतर खरे नाव काय याबद्दल शोधून काढण्यात आले. तेव्हा नलिनी सिंह असे या महिलेने नाव नसल्याचे समोर आले आहे. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हे फोटो जयपूरचे नाही तर लखनौचे आहेत. हे फोटो पत्रकार तुषार रॉय यांनी काढलेले आहेत. ईव्हीएम मशीन घेऊन जाणारी ही महिला अधिकारी लखनौच्या पीडब्ल्यूडी विभागात कनिष्ठ सहायक पदावर कार्यरत आहे आणि त्यांचं खरं नाव रीना द्विवेदी आहे.

व्हायरल झालेले फोटो ५ मे २०१९ म्हणजे निवडणुकीच्या एक दिवसाआधीचे आहेत. त्या दिवशी रीना द्विवेदी लखनौच्या नगराममध्ये बूथ नंबर 173 येथे असल्याचे रीना यांनी म्हटले आहे.