Lok Sabha Elections 2019: मतदान केल्याचे निशाण दाखवा, प्रत्येक खरेदीवर आकर्षक सूट मिळवा
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Lok Sabha Elections 2019: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी व्यापाऱ्यांनी मतदान करण्यासाठी जनतेत जागृता निर्माण होण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. तर मतदारांनी मतदान केल्याचे निशाण दाखवा आणि खरेदीवर आकर्षक सूट मिळवा अशी युक्ती झारखंड येथील व्यापाऱ्यांनी लढवली आहे. शुक्रवारी कार्यकारिणी यांची बैठक झाली. या बैठकीत मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावून त्याचा आकडा वाढण्यासाठी झारखंड चैंबर मदत करणार आहे.

तसेच राजकीय पक्षाकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सभा होतील. त्याचसोबत प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता येथील व्यापाऱ्याला त्याच्या उद्योगधंद्याबद्दल विचारुन पुढील धोरणे ठरवतात. त्यावरुन नेते मंडळी व्यापार अधिक सुकर होण्यासाठी विविध योजना सुरु करण्यासाठी व्यापारी मंडळींचे म्हणणे ऐकून घेऊन पुढील धोरण ठरवातात.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे ऐवजी सहा दिवसानंतर लावणार? निवडणुक आयोगाचा दावा)

त्याचसोबत बैठकीत असे सुद्धा सांगितले गेले की, दुकानदार काही वेळेस त्यांचे ट्रेड लायन्सचे नुतनीकरण करण्याचे विसरुन जातात. त्यामुळे त्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागतात. मात्र दुकानदारांना नियमांकडून अगोदर याबद्दल संकेत दिल्यास व्यापाऱ्यांना अतिरिक्त शुल्क भरावा लागणार नाही.