पिवळ्या रंगाच्या साडीतील महिलेनंतर निळ्या रंगातील ड्रेस मधील पोलिंग ऑफर्सच्या चर्चेला सोशल मीडियात उधाण
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

सोशल मीडियात सध्या लोकसभा निवडणूकीच्या चर्चा कमी असून त्यासाठी काम करणाऱ्या महिलांबद्दल अधिकच बोलले जात आहे. तर गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियात पिवळ्या रंगाच्या साडीतील महिला पोलिंग ऑफिर्सची चर्चा सुरु आहे. त्याचच आता अधिक भर पडली असून निळ्या रंगातील ड्रेस मधील आणखीन एका महिलेच्या लूकवरुन चर्चेला सोशल मीडियात उधाण आले आहे.

आज तक यांनी दिलेल्या वृत्तानुसार, निळ्या रंगातील ड्रेस मधील महिलेला भोपाळ येथील पोलिंग बूथवर काम करण्यासाठी पाठवण्यात आले होते. तर गोविंदपुरा विधानसभा येथील कोणत्यातरी एका बूथवर ही महिला ड्युटीसाठी असल्याचे बोलले जात आहे. तसेच हातात असलेल्या बॉक्सवर 154 असे लिहिले असून तो याच ठिकाणचा आहे असे म्हटले जात आहे.(पिवळ्या रंगातील साडीमधील पोलिंग ऑफिसरचे फोटो व्हायरल, सोशल मीडियात तुफान चर्चा)

तर सोशल मीडियात नेटकऱ्यांकडून याबद्दल विविध प्रतिक्रिया येत आहेत. ट्वीटरवर तर असे म्हटले जात आहे की, येथील पोलिंग बूथवर शंभर टक्के मतदान होणार हे नक्की आहे.