Kerala High Court: अविवाहित मातेचं मूलही आता भारताचा नागरिक, उच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण निर्देश
Court Hammer | (Photo Credits-File Photo)

केरळ उच्च न्यायालयाने (Kerala High Court) एक महत्त्वपूर्ण आदेश दिलेला आहे. एखाद्या व्यक्तीला त्याच्या ओळख कागदपत्रांमध्ये (Identity Proof) त्याच्या मर्जीनुसार वडिलांचे नाव न लिहिण्याचा अधिकार असेल. अविवाहित माता (Unmarried Mother) आणि बलात्कार पीडितांच्या मुलांना होत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन केरळ उच्च न्यायालयाने  निर्वाळा दिला आहे. याचिकाकर्त्याचे पालक म्हणून आता वडिलांचे नाव लिहणं बंधनकारक नाही केवळ आईच्या नावानेच ओळखपत्र जारी करण्यात यावे असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. केरळ उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अविवाहित आईचे मूलही भारताचे नागरिक (Citizen Of India) आहे आणि देशाचा नागरिक म्हणून कोणत्याही मूलभूत अधिकारांचे (Basic Human Rights) कोणीही उल्लंघन करू शकत नाही.

 

भारताच्या संविधानात देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी या अधिकारांची हमी देण्यात आली आहे. ती कोणताही अधिकारी त्यांची गोपनीयता, सन्मान आणि स्वातंत्र्याचा (Independence) अधिकार कमी करू शकत नाही, असे झाल्यास न्यायालय त्यांच्या अधिकारांचे रक्षण करेल, असे निर्देश केरळ उच्च न्यायालयाने दिले आहेत. यापूर्वी देशातील सर्व मुख्य जन्म आणि मृत्यू निबंधकांना पत्र पाठवून जन्म नोंदीमध्ये एकल पालकांचे नाव लिहिण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष मागणीनुसार इतर पालकांच्या नावाचा स्तंभ वगळण्यात यावा. जन्म प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि इतर कागदपत्रांमध्ये एकट्या आईचे नाव समाविष्ट करणे हा एखाद्या व्यक्तीचा अधिकार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने (supreme Court) म्हटले होते. (हे ही वाचा:- Supreme Court: दुकानावरील मराठी पाट्यांसंबंधी सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारसह महापालिकेला नोटीस जारी)

 

केरळ न्यायालयाने जन्म प्रमाणपत्रातून वडिलांचे नाव काढून टाकण्याचे आणि पालक म्हणून फक्त आईचे नाव असलेले प्रमाणपत्र जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच संबंधीत प्रकारणावर सुनावणी देताना न्यायमूर्ती कुन्हीकृष्णन (Kunhi Krishnan) यांनी महाभारतातील (Mahabharat) कर्णाचा हवाला देत म्हणाले " या समाजात कुणीही कर्ण (Karn) नसावा, जो आपल्या आयुष्याला कोसतो. कर्णाला त्याच्या आई-वडिलांचे नाव माहित नसल्यामुळे अपमानाला सामोरे जावे लागेल. पण भारतात आता असा कर्ण पुन्हा होवू नये यासाठी हे निर्देश देण्यात आलेत.