Omicron वरील लस देण्याच्या बहाण्याने घरात शिरलेल्या भामट्यांकडून सोन्याची चोरी
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- Pixabay)

कर्नाटक येथे ओमिक्रॉन (Omicron) वरील लस देण्याच्या बहाण्याने सकाळच्या वेळेस चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही भामट्यांनी लस देतो म्हणून घरात घुसले आणि सोन्याचे दागिने पळवले. या प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.प्राप्त झालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण यशवंतपुर परिसरातील आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु करत काही जणांची चौकशी सुद्धा केली. ज्यांच्या घरी लस देण्याच्या बहाण्याने चोरी झाली त्यांच्या येथे एक लाल रंगाची कार सापडली असून ती पोलिसांनी जप्त केली आहे.

पोलिसांच्या मते, गाडीतून तीनजण आले होते. कथित रुपात चोरट्यांनी वाहनाची रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बदलली होती. पोलिसांना संशय आहे की, कारची सुद्धा चोरी केली होती. तर चोरट्यांनी संपत सिंह यांची पत्नी देवी आणि सून रक्षा यांना कोविड19 लसीबद्दल विचारले. पिस्ता देवी हिने नवऱ्याला फोन करण्याच्या प्रयत्न केला. परंतु भामट्यांनी त्यांच्या डोक्यार पिस्तूल धरत त्यांना एका खोलीत बंद केले. त्यानंतर त्यांनी 50 ग्रॅम सोन्याचे दागिने लूटून नेले.(Omicron variant in India: भारतामध्ये कर्नाटक पाठोपाठ गुजरात मध्ये एकाला ओमिक्रॉन ची लागण; देशात ओमिक्रॉनचे 3 रूग्ण)

पिस्ता देवी हिचा मोठा मुलगा विक्रम हा घरी आला तेव्हा भामट्यांनी त्याला तु लस घेतली का असा सवाल केला. तेव्हा त्याने माझे लसीकरण झाल्याचे सांगितले असता भामट्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांनी चोरी प्रकरणी दोन लोकांना ताब्यात घेतली असून त्यांची चौकशी करत आहेत.