कर्नाटक: CAA वरुन सादर करण्यात आलेल्या नाटकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान, शाळेच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि एनआरसीच्या (NRC) संदर्भात कर्नाटक (Karnataka) मधील एका शााळेतील विद्यार्थ्यांनी नाटक सादर केले. त्या नाटकादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करत त्यांचा अपमान केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शाळेच्या व्यवस्थापनांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोदी यांच्यासह सरकारमधील अन्य जणांच्या विरोधात सुद्धा अपमानकारक शब्द वापरण्यात आले आहे. यावर शाळेने स्पष्टीकरण देत असे म्हटले आहे की, आम्ही काहीही चुकीचे केले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

21 जानेवारीला नागरिकत्व सुधारणा कायद्यावर एका नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कथित रुपात नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपशब्द वापरण्यात आले होते. शाहीन ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी तौसीफ मदिकेरी यांनी असे म्हटले आहे की, त्यांच्या एकूण 43 शैक्षणिक संस्था असून 20 हजार विद्यार्थी संस्थेत शिक्षण घेतात. पण सीएएवरुन घडलेल्या प्रकरणी बुधावारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. तेथे आम्ही आमची बाजू मांडणार आहोत असे सांगण्यात आले आहे. शाळेतील अवघ्या 10-11 वर्षाच्या मुलाने सीएए वरुन मोदी यांच्या विरोधात अनावधानाने अपशब्द उच्चारल्याने शाळेच्या विरोधात देशद्रोहाचा खटला कसा दाखल केला जाऊ शकतो असा प्रश्न उपस्थित केला आहे.(दिल्ली: देश मे सिर्फ हिंदू की चलेगी! शाहीनबाग मध्ये गोळीबार करणाऱ्या कपिल गुज्जर याचे अटकेनंतर वादग्रस्त विधान Watch Video)

तर शाळेच्या मुख्याध्यापिका आणि एका विद्यार्थ्याच्या आईला 30 जानेवारीला अटक करण्यात आली. या प्रकरणी 26 जानेवारीलाच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल, अशा स्वरुपाचे कृत्य शाळेमध्ये केले गेल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये सामाजिक कार्यकर्ते नीलेश रकशयाल यांनी म्हटले होते.