कलम 370 हटवल्याने ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले मोदी सरकारचे समर्थन
Jyotiraditya Scindia (Photo Credits-ANI)

जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir)  मधून कलम 370 हटवल्याने काँग्रेसच्या (Congress) बड्या नेत्यांकडून याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. मात्र लोकसभेत जम्मू-कश्मीर विभाजन विधेयक 370 विरुद्ध 70 मतांनी मंजूर करण्यात आले आहे. यामुळे सर्वत्र पुन्हा एकदा आनंद साजरा केला जात आहे. याच पार्श्वभुमीवर आता जोतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी मोदी सरकारचे समर्थन करत एक ट्वीट केले आहे.

ज्योतिरादित्य यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, जम्मू-कश्मीर-लद्दाख आणि भारताचे एकीकरण करण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाचे समर्थन करत आहे. मात्र संविधान प्रक्रियेचे पालन केले असते तर ते उत्तम झाले असते. तेव्हा कोणीही प्रश्नउपस्थित केले नसते. तरीही मोदी सरकारचा हा निर्णय देशाच्या हितासाठी असून मी याचे समर्थन करत आहे.(Jammu and Kashmir: जम्मू-कश्मीर मधील कलम 370 रद्द, विभाजन विधेयक 370 विरुद्ध 70 मतांनी लोकसभेत मंजूर)

काँग्रेस नेते राहुल गांधी ) यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाअंतर्गत नेत्यांचे राजीनामा सत्र होते. 7 जुलै रोजी मिलिंद देवरा यांनी मुंबईतील काँग्रेस पक्षातील अध्यक्षपद सोडले आहे. त्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सुद्धा सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला.