जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ; एक पोलिस अधिकारी शहीद
दहशतवादी हल्ला (Photo Credit : ANI)

दक्षिण काश्मीरमधील शोपिया जिह्यातील एक दहशतवादी हल्ला झाला. या जिल्ह्यातील एका पोलिस स्टेशनवर रविवारी सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला असून या हल्ल्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला होता. या जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याची मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली असून तो शहीद झाला आहे.

या हल्ल्यानंतर दहशतवादी फरारी झाले आहेत. सध्या पोलिस स्टेशनच्या संपूर्ण परिसराला सुरक्षा रक्षकांनी वेढा दिला आहे. तसंच दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. दहशतवादी याच भागात लपलेले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.