जम्मू-काश्मीर: कुलगाम येथे सुरु असलेल्या चकमकीत 5 दहशतवाद्यांना कंठस्नान; 4 जवान जखमी
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात आज (रविवार, 10/2/2019) पहाटेपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत 5 दहशतवादी ठार झाले आहेत. त्यांच्या जवळील शस्त्रसाठी जप्त करण्यात आला आहे. या चकमकीनंतर स्थानिकांनी दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ सुरक्षारक्षकांवर दगडफेक केली. यात 4 जवान जखमी झाले. सुरक्षा दलाच्या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सुरक्षा दलाने परिसराला चारही बाजुनी वेढले आणि त्यांच्यात चकमक सुरु झाली. अद्याप चकमकी सुरु असून मोबाईल-इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली.

गेल्या आठवड्यात पुलवामा येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षारक्षकांना यश आले. हे दोन्ही दहशतवादी जॅश-ए-मोहम्मद या संघटनेशी संलग्न होते.