Indian Soliders (Photo Credit- IANS)

जम्मू काश्मीर (Jammu&Kashmir) मधील केरन (Keran) येथे काल सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. दहशतावादी नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना रोखण्याच्या प्रयत्नात झालेल्या चकमकीत एकूण 5 जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. चकमकीदरम्यात एक जवान शहीद झाला तर चार जवान जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. यापूर्वी 3 जवानांना चकमकीत आपले प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे या चकमकीत एकूण 5 जवान शहीद झाले आहेत. तर नियंत्रण रेषा ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतील लष्कराला यश आले आहे. संरक्षण प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रचंड प्रमाणात हिमवृष्टी होत असलेल्या जखमी झालेल्या जवानांना सुरक्षित स्थळी हलवणे कठीण जात आहे.

काश्मीर खोऱ्यात सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्या चकमकी सातत्याने सुरु असतात. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या चकमकीत यापूर्वी 9 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. (काश्मीर खोऱ्यात गेल्या 24 तासांत भारतीय लष्कराकडून 9 दहशतवाद्यांचा खात्मा)

ANI Tweet:

बुधवारी दुपारी सुरक्षारक्षकांनी दहशतवाद्यांना घेरले होते. त्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षारक्षक यांच्यात एकच चकमक उडाली. मात्र धुकं आणि पावसाचा फायदा घेत दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला. शनिवारी वातावरण अनुकूल झाल्यानंतर सुरक्षारक्षकांनी शोधमोहिम सुरु केली. या शोधमोहिमेत भारतीय जवानांनी ड्रोन आणि हेलिकॉप्टरचा वापर केला. शनिवारी संध्याकाळी दहशतवाद्यांना शोधण्यात जवान यशस्वी झाले आणि त्यांच्यात पुन्हा चकमक सुरु झाली.

यापूर्वी 4 एप्रिल रोजी दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षारक्षकांनी चार दहशवाद्यांचा खात्मा केला होता. हे चारही दहशतवादी हिजबुल मुजाहिदीनचे होते. या आतंकी समुहाने गेल्या काही दिवसात दक्षिण काश्मीर मध्ये अनेक नागरिकांची हत्या केली होती.