पंजाबमध्ये घुसले जैश-ए-मोहम्मदचे 7 दहशतवादी; दिल्लीत हाय अलर्ट
प्रतीकात्मक फोटो (Photo Credits: ANI)

पंजाबमधील फिरोजपूरमध्ये जैश ए मोहम्मदचे सात आतंगवादी घुसल्याची माहिती समोर येत आहे. या धक्कादायक माहितीनंतर पंजाबमध्ये हाय अलर्टची घोषणा करण्यात आली आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनंतर राज्य हाय अलर्ट लागू करण्यात आला असून पोलिस आणि प्रशासन या प्रकरणाचा अधिक शोध घेत आहेत.

खुफिया एजेंसीने दिलेल्या माहितीनुसार, फिरोजपूरमध्ये 7 आतंगवादी घुसले असून ते राजधानी दिल्लीत घुसून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. लवकरच ते दिल्लीच्या दिशेने प्रस्तान करतील. त्यामुळेच फिरोजपूर, पंजाबच्या काही भागात पोलिस, लष्करी गस्त वाढवण्यात आली आहे.

ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात येत आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून काऊंटर इंटेलिजेंस ऑफ पंजाबचे आयजी यांनी सर्व पोलिस कमिशनर आणि पोलिस विभागांना पत्र लिहून याबद्दल सूचित केले आहे.