Coronavirus in India: भारतात कोविड-19 रुग्णांच्या संख्येने पार केला 8 लाखांचा टप्पा; मागील 24 तासांत आढळले 27,114 नवे रुग्ण
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारतात कोरोना व्हायरसने (Coronavirus) धुमाकूळ घातला असून देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या ही 8 लाखांच्या पार गेली आहे. भारत सरकार आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 27,114 नवे रुग्ण आढळले असून देशात एकूण कोरोना बाधितांची संख्या 8,20,916 वर पोहोचली आहे. तसेच काल (10 जुलै) दिवसभरात 514 कोरोना रुग्ण दगावले असून देशात मृतांचा आकडा 22,123 वर पोहोचला आहे. भारतात (India) सद्य घडीला 2,83,407 रुग्ण उपचार घेत असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. तसेच काल दिवसभरात 19,873 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 5,15,386 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून राज्यात एकूण 2,38,461 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे राज्यात 9,893 रुग्णाचा बळी गेला आहे. तसेच 1 लाख 32 हजार 625 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. कोरोना व्हायरस लस किंवा औषध सापडले नाही, तर भारतात फेब्रुवारी 2021 पर्यंत दररोज आढळतील 2.87 लाख रुग्ण - MIT च्या अभ्यासातून खुलासा

भारतात महाराष्ट्रापाठोपाठ तमिळनाडू, नवी दिल्ली आणि गुजरातमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. भारतात आतापर्यंत 1,13,07,002 कोविड-19 च्या चाचण्या झाल्या असून यात 10 जुलै ला 2,82,511 चाचण्या घेण्यात आल्या अशी माहिती ICMR ने दिली आहे.