American Visa Appointments च्या प्रतिक्षेमध्ये असणार्‍या भारतीयांना आता परदेशातही US Embassies मध्ये करता येणार अर्ज

विद्यार्थी व्हिसाची (F-1) प्रतीक्षा वेळ सुमारे 90 दिवसांवर स्थिरावली असताना, व्यवसाय आणि पर्यटक व्हिसा (B-1, B-2) प्रतीक्षा वेळ जास्त आहे, देशातील बहुतेक काऊंस्लेट्स मध्ये जवळजवळ दोन वर्षांपर्यंत पोहोचते.

Visa | Representational Image | (Photo Credits: PTI)

भारतीयांना अमेरिकन व्हिसा (US Visa)  मिळवण्यासाठी लागणारा वेळ पाहता आता यासाठी US embassy in India ने नवा पर्याय समोर ठेवला आहे. ही व्हिसा प्रोसेसिंग (Visa Processing) कमी करण्यासाठी अन्य देशामधूनही काऊसलेटच्या माध्यमातून व्हिसा साठी अर्ज केला जाऊ शकतो. थायलंडचं उदाहरण देता एम्बेसीने दिलेल्या माहितीनुसार, तेथून भारतीयांसाठी बी 1/ बी 2 अपॉईंटमेट्स खुल्या करण्यात येतील. येत्या काही महिन्यामध्ये ही सोय उपलब्ध केली जाणार आहे. बॅंकॉक मध्ये बी 1/ बी 2 मुलाखतींचा कालावधी अवघ्या 14 दिवसांचा आहे.

ट्वीट करत US embassy कडून त्याची माहिती देण्यात आली आहे. नक्की वाचा: World's Most Powerful Passports 2023: Henley Passport Index च्या यादीत जपान सलग 5व्यांदा 'मोस्ट पॉवरफूल पासपोर्ट'; भारताचं स्थान देखील सुधारलं .

पहा ट्वीट

मागील महिन्यात, एम्बसीने अनेक नवीन उपक्रम सुरू केले, ज्यात व्हिसा प्रक्रियेतील विलंब कमी करण्यासाठी प्रथमच अर्जदारांसाठी विशेष मुलाखती शेड्यूल करणे आणि कॉन्सुलर स्टाफची संख्या वाढवणे यांचा समावेश आहे. मिशनने शनिवारी देखील निवडक मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नाही तर, यूएस स्टेट डिपार्टमेंटने पूर्वीचा यूएस व्हिसा असलेल्या अर्जदारांसाठी interview waiver cases मध्ये रिमोट प्रक्रिया देखील लागू केली आहे.

प्रथमच व्हिसा अर्जदारांच्या दीर्घ प्रतीक्षा कालावधीबद्दल चिंता वाढत आहे. भारतात प्रथमच B1/B2 व्हिसा अर्जदारांचा प्रतीक्षा कालावधी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तीन वर्षांच्या जवळपास होता.

विद्यार्थी व्हिसाची (F-1) प्रतीक्षा वेळ सुमारे 90 दिवसांवर स्थिरावली असताना, व्यवसाय आणि पर्यटक व्हिसा (B-1, B-2) प्रतीक्षा वेळ जास्त आहे, देशातील बहुतेक काऊंस्लेट्स मध्ये जवळजवळ दोन वर्षांपर्यंत पोहोचते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now