Indian Millionaires Migration 2024: या वर्षी सुमारे 4,300 लक्षाधीश भारत सोडून इतर देशांमध्ये स्थलांतरीत होण्याची शक्यता- Reports

मात्र भारताच्या बाबतीत परिस्थिती थोडी वेगळी आहे. देश सोडून गेले तरी येथील लक्षाधीश देशातील आपला व्यवसाय आणि रिअल इस्टेट सोडत नाहीत. इथून निघून गेल्यावर ते भारताला आपले दुसरे घर बनवतात.

Leaving India, Migration from India Representational Image (Photo Credit: Pexels)

Indian Millionaires Migration 2024: भारतात आर्थिक विकास वेगाने होत आहे. म्हणूनच देशातील लक्षाधीश-कोट्याधीशांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. आता देशासाठी एक दिलासादायक बाब समोर आली आहे की, भारतामधील बहुतेक लक्षाधीश (Millionaires) देशातच राहणे पसंत करत आहेत. यावर्षी भारत सोडून परदेशात स्थायिक होणाऱ्या लक्षाधीश भारतीयांच्या संख्येत मोठी घट होण्याची शक्यता आहे. एका अहवालानुसार 2024 मध्ये सुमारे 4300 कोट्याधीश भारत सोडून जाऊ शकतात. वर्षभरापूर्वी ही संख्या 5100 च्या आसपास होती.

भारत सोडून परदेशात जाणाऱ्यांची पहिली पसंती अमेरिका (USA) नसून यूएई (UAE) असल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये श्रीमंत भारतीयांसाठी गुंतवणुकीच्या संधी वाढत असल्याचेही अहवाल नमूद करतात.

न्यू वर्ल्ड वेल्थ आणि हेन्ली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन, 2024 च्या अहवालांवर आधारित, मनी कंट्रोलने माहिती दिली आहे की, या वर्षीही भारतात उच्च नेट वर्थ व्यक्तींच्या (एचएनआय) संख्येत मोठी वाढ होईल. मात्र देश सोडून जाणाऱ्या श्रीमंत लोकांच्या संख्येत यावर्षी लक्षणीय घट होईल. या अहवालात अशा लोकांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांची एकूण संपत्ती किमान 10 लाख डॉलर (8.34 कोटी रुपये) आहे. (हेही वाचा: Gautam Adani On Indian Economy: 2032 पर्यंत भारत 10 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल; गौतम अदानी यांची भविष्यवाणी)

श्रीमंतांच्या स्थलांतराचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो. मात्र भारताच्या बाबतीत परिस्थिती थोडी वेगळी आहे. देश सोडून गेले तरी येथील लक्षाधीश देशातील आपला व्यवसाय आणि रिअल इस्टेट सोडत नाहीत. इथून निघून गेल्यावर ते भारताला आपले दुसरे घर बनवतात. म्हणूनच, एनआरआयच्या माध्यमातून भारतात येणारा पैसा 2022 मध्ये अंदाजे 9.26 लाख कोटी रुपये ($111 अब्ज) पर्यंत पोहोचला आहे. गेल्या महिन्यात जारी करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात हा दावा करण्यात आला. दरम्यान, भारत ही सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 8.2 टक्के वाढ अपेक्षित आहे. गेल्या दशकात देशातील लक्षाधीशांची संख्या 85 टक्क्यांनी वाढली असून ती 3,26,400 च्या जवळपास आहे. याबाबत भारताचा जगात दहावा क्रमांक लागतो.



संबंधित बातम्या