MP-ATGM: भारतीय सैन्याची क्षमता वाढवणाऱ्या 'मॅन पोर्टेबल अँटी टँक गायडेड मिसाईल'चे राजस्थान मध्ये यशस्वी परिक्षण
Missiles (Representational Image/ Photo Credit: PTI/File)

मॅन पोर्टेबल अँटी टँक गायडेड मिसाईल (MP-ATGM) चे परिक्षण करण्यात भारताला यश आले आहे. सेनेच्या भूदलासाठी (Infantry Troops) हे मिसाईल विकसित करण्यात आले आहे. भारताचे संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (India’s Defense Research and Development Organization) राजस्थानमध्ये (Rajasthan)  बुधवारी (14 मार्च) 2-3 किलोमीटरच्या स्ट्राईक रेंजसह या मिसाईलचे परिक्षण केले. यापूर्वी DRDO ने देशात विकसित गायडेड रॉकेट प्रणाली 'पिनाक' चे यशस्वी परिक्षण पार पाडले.

ANI ट्विट

पिनाक प्रणाली अत्याधुनिक सुविधांनी सज्ज आहे. यात नेव्हिगेशन आणि नियंत्रण प्रणालीचाही समावेश आहे. यामुळे सेनेची क्षमता अधिक वाढेल. यासंर्भात संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, "डिआरओ द्वारा स्वदेश विकसित पिनाक, सटीक हे शस्त्र भंडार अधिक सक्षम करतील." MP-ATGM यशस्वी परिक्षणानंतर संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी डिआरडीओची टीम, भारतीय सेना आणि अन्य संस्थांचे अभिनंदन केले.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे मिसाईल तुम्ही खांद्यावरुन चालवू शकता. याची क्षमता 4 किलोमीटर इतकी आहे. भारताच्या नाग मिसाईल सिरीजमधील हे एक मिसाईल आहे. शत्रूची स्थळे, टँक उद्धवस्त करण्यासाठी या मिसाईची नक्कीच मदत होईल.