India-Russia Oil Business: 'आम्ही जो त्रास भोगत आहोत, त्यामुळेच भारत रशियाकडून स्वस्तात दरात तेल विकत घेत आहे'; युक्रेनचे परराष्ट्रमंत्री Dmytro Kuleba यांचा निशाणा
Ukrainian Foreign Minister Dymtro Kuleba, Credits: Facebook

युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्री कुलेबा (Dmytro Kuleba) यांनी रशियाकडून होणाऱ्या तेलाच्या व्यवसायाबाबत भारतावर जोरदार हल्ला चढवला. दिमित्री कुलेबा म्हणाले की, युक्रेन त्रास भोगत आहे म्हणूनच भारत रशियाकडून स्वस्त तेल विकत घेऊ शकतो. भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे नैतिकदृष्ट्या अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एनडीटीव्हीशी एका खास संभाषणात दिमित्री कुलेबा म्हणाले की, युक्रेनियन रशियन आक्रमणामुळे त्रस्त आहेत, आमचे नागरिक दररोज मारत आहेत याच वस्तुस्थितीतून स्वस्त दरात रशियन तेल खरेदी करण्याची भारताला संधी मिळते.

दिमित्री कुलेबा भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या विधानाला उत्तर देत होते, ज्यात त्यांनी म्हटले होते की, या वर्षी फेब्रुवारी ते नोव्हेंबर या महिन्यांमध्ये रशियाने युरोपियन युनियन (EU) देशांपेक्षा जास्त तेल आणि वायू आयात केला आहे. कुलेबाच्या मते, स्वस्त रशियन तेल आयात करण्याच्या भारताच्या निर्णयाला युक्रेनमधील मानवी दुःखाच्या प्रिझममधून पाहिले पाहिजे.

युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी असेही सांगितले की, युद्ध संपवण्यासाठी मदत करण्यात भारत विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. भारत हा जागतिक क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचा देश असून भारताचे पंतप्रधान आपल्या आवाजाने युक्रेनमध्ये बदल घडवून आणू शकतात. ते म्हणाले की, युक्रेन त्या क्षणाची वाट पाहत आहे जेव्हा भारताचे परराष्ट्र धोरण रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याचे उघडपणे मान्य करेल. सध्या ते फक्त इतकेच म्हणत आहे की, युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. (हेही वाचा: कोविड-19 विषाणू मानवनिर्मित, चीनमधील वुहान लॅबमधून झाला लीक; अमेरिकन शास्त्रज्ञाचा खळबळजनक दावा)

भारताचे रशियाशी जवळचे धोरणात्मक संबंध आहेत आणि युक्रेनच्या भूभागावरील रशियाच्या ताब्याचा निषेध करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांमध्ये मॉस्कोच्या विरोधात मतदान करण्यापासून भारताने वारंवार स्वतःला परावृत्त केले आहे. भारताच्या हस्तक्षेपामुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विचारसरणीत काही बदल होऊ शकतो का? या प्रश्नाला उत्तर देताना युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, एकत्रित प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही प्रयत्न केले नाही तर काहीही बदलू शकत नाही.