Coronavirus Update: देशभरातील COVID-19 संक्रमितांच्या संख्येत 43% घट, पाठमागील 24 तासात 1,247 जणांना संसर्ग
Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

भारतातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पाठिमागील 24 तासात देशभरात एकूण 1,247 नागरिकांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. तर केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. देशात सध्यास्थितीत सक्रीय कोरोना (COVID-19) रुग्णांची संख्या 11,860 इतकी आहे. देशभरातील एकूण कोरोना रुग्णांच्या तुलनेत हा आकडा 0.03% इतका आहे. देशातील एकूण कोरोना संक्रमितांची संख्या आता 43,045,527 वर पोहोचली आहे. ही एकूण रुग्णसंख्या असून यात उपचार घेऊन बरे झालेले, मृत आणि सक्रिय रुग्णसंख्येचाही समावेश आहे.

पाठिमागील 24 तासात देशभरात आढळलेल्या एकूण कोरना रुग्णांसोबत देशभरातील रिकवरी रेट 98.76% वर पोहोचला पोहोचला आहे. आतापर्यंत भारतात 42,511, 701 कोरोनावर मात करुन बरे झाले आहेत. वैद्यकीय उपचार आणि प्रतिकारशक्तीच्या जोरावर त्यांनी हा लढा यशस्वी केला. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेंतर्गत देशभरात 186.72,15865 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. पाठिमागील 24 तासातही 16,89,995 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. (हेही वाचा, Covid-19 Update: भारतात पुन्हा वाढतोय कोरोना विषाणूचा धोका? एका आठवड्यात कोरोना रुग्णांमध्ये 35 टक्क्यांची वाढ)

ट्विट

राजधानी दिल्लीत सरग दुसऱ्या दिवशी 500 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीतील संक्रमितांचा दरही 7% इतका राहिला आहे. राजधानीमध्ये पाठिमागील 24 तासात 501 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे कोरोना संक्रमितांची संख्या ,7.79% झाली आहे. जी जावेवारी महिन्यानंतरची सर्वाधीक आहे. 28 जानेवारी रोजी दिल्लीतील कोरोना संक्रमितांची टक्केवारी 8.60 इतकी होती.