IBPS Clerk Recruitment 2024: बँकेत नोकरी मिळवण्याची उत्तम संधी; आयबीपीएसने सुरु केली 6 हजारपेक्षा जास्त पदांसाठी नोकरभरती, जाणून घ्या वयोमर्यादा, पात्रता व निवडा प्रक्रिया
शुल्क जमा करण्याचीही ही शेवटची तारीख आहे.
IBPS Clerk Recruitment 2024: बँकेत सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आली आहे. बँकिंग कर्मचारी निवड संस्थाने (IBPS) लिपिक भरती 2024 साठी ibpsonline.ibps.in वर अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. दरवर्षी आयबीपीएस या परीक्षेद्वारे देशातील विविध सरकारी बँकांमध्ये लिपिकांची नियुक्ती करते. आयबीपीएस लिपिक 2024 अधिसूचना 1 जुलै रोजी प्रसिद्ध झाली आहे, त्यानंतर या पदांसाठी ऑनलाइन नोंदणी देखील सुरू झाली आहे. आयबीपीएस क्लर्क भरती 2024 मध्ये 6 हजार पेक्षा जास्त लिपिक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
या लिपिक पदांसाठी 1 जुलै ते 21 जुलै 2024 पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात. शुल्क जमा करण्याचीही ही शेवटची तारीख आहे. आयबीपीएस लिपिक 2024 साठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवारांना संगणकाचेही ज्ञान असावे. उमेदवारांना ज्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी ते अर्ज करू इच्छितात त्या राज्याच्या अधिकृत भाषेचे ज्ञान असले पाहिजे. या भरती मोहिमेद्वारे एकूण 6,128 जणांची भरती केली जाणार आहे.
वयोमर्यादा-
अर्जदारांचे किमान वय 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे असावे. म्हणजेच उमेदवारांचा जन्म 02 जुलै 1996 पूर्वी आणि 01 जुलै 2004 नंतर झालेला नसावा. वयोमर्यादा एससी/एसटी उमेदवारांसाठी 5 वर्षे, ओबीसीसाठी 3 वर्षे आणि पीएच उमेदवारांसाठी 10 वर्षे शिथिल आहे.
शुल्क-
आयबीपीएस लिपिक भरती 2024 साठी अर्ज करताना, SC/ST/PwBD/ESM/DESM उमेदवारांना 175 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी हे शुल्क 850 रुपये आहे. योग्य उमेदवार ibpsonline.ibps.in च्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.
निवड प्रक्रिया-
प्रिलिम परीक्षा, मुख्य परीक्षा, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय या आधारावर या पदांसाठी भरतीसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. (हेही वाचा: Bank Holidays in July 2024: पुढीच्या महिन्यात एकूण 12 दिवस बंद राहणार बँका; महत्वाची कामे पूर्ण करायची असतील तर जाणून घ्या सुट्ट्यांची यादी)
बँक भरतीसाठी एकूण 11 बँका सहभागी-
बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक इंडियन, ओव्हरसीज बँक, यूको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक पंजाब आणि सिंध बँक सहभागी आहेत.