पत्नीने करवा चौथचे व्रत करण्यास नकार दिल्याने पतीची आत्महत्या
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

पत्नीने करवा चौथचे व्रत करण्यास नकार दिल्याने मथुरेतील एका 21 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दीपचंद असे या तरुणाचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील मथुरेचा रहिवासी होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीने करवा चौथचे व्रत करण्यास नकार दिल्याने नाराज असलेल्या दीपचंदने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या घरातून सुसाईड नोट सापडली नाही. वृंदावन पोलिस स्टेशनचे अधिकारी राम पाल सिंग भाटी यांनी सांगितले की,

"दीपचंद याचे चार महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. करवा चौथचे व्रतावरुन त्यांच्यात वाद झाला."

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपचंदच्या पत्नीने प्रकृती ठीक नसल्याने करवा चौथचे व्रत करण्यास नकार दिला. त्यास दीपचंदच्या आईने देखील पाठींबा दर्शवला.

परंतु, आपल्या मतावर ठाम असलेल्या दीपचंदने स्वतःला खोलीत कोंडून घेतले आणि गळफास घेत आत्महत्या केली. सकाळी उठल्यानंतर पत्नीच्या हा प्रकार लक्षात आला.

याप्रकरणी पोलिस अधिक चौकशी करत असून मृतदेह पोस्टमार्टमासाठी पाठवण्यात आला आहे.