GST Council Meeting: हॉटेलमध्ये रुमच्या भाड्यासोबत आकारण्यात येणाऱ्या GST मध्ये घट, सरकारचा निर्णय
निर्मला सीतारमण (Photo Credits-ANI)

जीएसटी काउंसिलच्या बैठकीत (GST Council Meeting) हॉटेलच्या भाड्यासोबत आकारण्यात येणाऱ्या जीएसटी (GST) दरात घट करण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांना हॉटेल मध्ये राहण्यासाठी रुम खिशाला परवडणाऱ्या पैशांमध्ये उपलब्ध होणार आहेत. तर 1 हजार रुपयांपासून ते 7500 रुपयापर्यंतच्या हॉटेल भाड्यासोबत 12 टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. तसेच 7500 रुपयांपेक्षा अधिक भाडे असलेल्या हॉटेलच्या रुमवर 18 टक्के जीएसटी लावण्यात येणार आहे. त्याचसोबत 1 हजारापेक्षा कमी असलेल्या हॉटेल रुमवर जीएसटी आकारण्यात येणार नाही आहे.

आतापर्यंत 7500 रुपयाखालील हॉटेल रुमसाठी 18 टक्के जीएसटी नागरिकांना द्यावा लागत होता. त्याचसोबत 7500 रुपयापेक्षा अधिक भाड्यावर 28 टक्के जीएसटी आकारण्यात येत होता. त्यामुळे 7500 पेक्षा कमी किंवा अधिक हॉटेलच्या रुमवर आकारण्यात येणाऱ्या जीएसटीवर 10 टक्क्यांपर्यंत घट केली आहे.(कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा सरकारचा निर्णय, शेअर बाजारात 1600 अंकांची उसळी)

शुक्रवारी गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या जीएसटी काउंसिलच्या 37 व्या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीदरम्यान माहिती देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी असे म्हटले आहे की, एरिए़टेड शीतपेयांवर (गॅस असणारे) 18 टक्क्यांऐवजी आता 28 टक्के टॅक्स लावण्यात येणार आहे. त्याचसोबत 12 टक्के कंपनसेटरी सेस सुद्धा लावण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच बैठकीत ऑटोमोबाईल, बिस्किट, माचिस, आउटडोर कॅटरिग सेगमेंटच्या जीएसटी दरात बदलाव करण्यात येणार असल्याचा मुद्दा मांडण्यात आला आहे. त्याचसोबत निर्मला सीतारमण यांनी कंपनी आणि उद्योजकांना दिलासा देत कॉर्पोरेट टॅक्समध्ये ही कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.