Jet Airways धमाकेदार ऑफर्स Domestic आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी तिकिट दरात थेट 50% Discount
'Global Sale' ऑफर अंतर्गत ही सूट देण्यात आल्याचेजेट एअरवेजने म्हटले आहे. दरम्यान, ही ऑफर केवळ 11 जानेवारी 2019 पर्यंतच सुरु असणार आहे.
तुम्ही जर विमान प्रवासाबाबत विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. जेट एअरवेज (Jet Airways) ही कंपनी प्रवाशांसाठी तिकीट दरांमध्ये तब्बल 50 टक्क्यांची सूट घेऊन आली आहे. ही सवलत Domestic आणि Internationalविमान प्रवासासाठी असेल. जेट एअरवेजने या ऑफरची शनिवारी घोषणा केली. 'Global Sale' ऑफर अंतर्गत ही सूट देण्यात आल्याचेजेट एअरवेजने म्हटले आहे. दरम्यान, ही ऑफर केवळ 11 जानेवारी 2019 पर्यंतच सुरु असणार आहे.
जेट एअरवेजच्या ऑफरबाबत अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास ती jetairways.com. वर उपलब्ध आहे. गेल्या काही काळापासून विमान कंपन्यांमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेमुळे जेट एअरवेजने ही ऑफर देऊ केल्याचे सांगितले जात आहे. जेट एअरवेज ही विमान कंपनी आपल्या प्रवासी ग्राहकांसाठी नेहमीच नवनव्या ऑफर्स घेऊन येताना दिसते. नेहमीप्रमाणे 2019 या नव्या वर्षातही जेट एअरवेज प्रवाशांना अनेक चांगल्या ऑफर देण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, हवाई प्रवासादरम्यान महिला बाळंत, जकार्ताला जाणाऱ्या विमानाचे मुंबईत एमरजन्सी लॅंडीग)
दरम्यान, जेट एअरवेजची ही ऑफर एकेरी आणि दुहेरी (आरत-परत) अशा प्रवासासाठी आहे. प्रवाशाने या ऑफरखाली तिकीट बुक केले असेल आणि अचानकपणे विमान प्रवासात काही बदल करावा लागला तर त्याची कल्पना जेट एअरवेजच्या अधिकृत संकेतस्थलावर (वेबसाईट) दिली जाईल. अंतिम अधिकार जेट एअरवेजकडेच असतील. ही ऑफर Muscat आणि Sharjah या प्रवासासाठी लागू नाही. domestic प्रवासासाठी या ऑफर अंतर्गत ग्राहकाला किमान 8 दिस आगोदर तिकीट खरेदी करावे लागेल. म्हणजेच एखाद्या प्रवाशाला 13 जानेवारी या दिवशी प्रवास करायचा असेल तर त्याला 8 दिवस आगोदर तिकीट बुक करावे लागेल.