Golden Baba सुधीर कुमार मक्कड याचा मृत्यू; खंडणी, धमकीसारखे अनेक गुन्हे होते दाखल
Golden Baba | ( Photo Credit: ANI )

Golden Baba अशी ओळख असलेल्या सुधीर कुमार मक्कड (Sudhir Kumar Makkar) याचा मृत्यू झाला आहे. प्रदीर्घ आजारानंतर उपचार घेत असताना दिल्ली येथील एम्स रुग्णालयात मंगळवारी रात्री त्याचे निधन झाले. त्याच्या निधनामुळे बाबाचे अनेक चाहते आणि भक्त यांना दु:ख झाले आहे. गोल्डन बाबा म्हणून सर्वपरिचित असलेल्या सुधीर कुमार मक्कड याच्यावर खंडणी, धमकी यांसारख्या विविध गुन्ह्यांचे आरोप होते. तसेच, त्याच्यावर काही गुन्हेही दाखल होते. बुधवारी सकाळी या गोल्डन बाबावर गीता कॉलनी येथी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्याचे कुटुंबीय आणि काही नातेवाईक उपस्थित होते.

बाबाच्या जवळच्या शिष्याने दिलेल्या माहितीच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, प्रदीर्घ काळापासून गोल्डन बाबात कर्करोगाच्या आजाराने त्रस्त होता. 18 मे या दिवशी त्याची प्रकृती अधिकच बिघडली. त्यानंतर त्याला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. एक महिना व्हेंटीलेटरव राहिल्यानंतर 30 जूनच्या रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. (हेही वाचा, जादू केली अंगलट आली; कुलूपबंद पेटीतून नदीत उतरलेला जादूगार गायब; आठ तास उलटूनही लागला नाही पत्ता)

सुधीर मक्कड उर्फ गोल्डन बाबा मुळचा गाझियाबादचा रहिवासी होता. तो आणि त्याची पत्नी इंदिरापुरम जीसी ग्रँड सोसायटीत राहात असत. कावड यात्रेत तब्बल 20 किलो सोने अंगावर परीधान करुन निघाल्याळे तो भलताच चर्चेत आला होता. त्याला प्रसिद्धीही मिळाली होती. तो बरेली येथील जुना आखाडा मंहत म्हणूनही ओळखला जात असे. त्याच्यावर अपहरण, खंडणी, धमकी, जबरदस्तीनं वसुली, मारहाण, हत्येचा प्रयत्न असे अनेक गुन्हे पूर्व दिल्ली येथे नोंद आहेत. तो गारमेंटस क्षेत्रातही कार्यरत होता.