Gold, Silver Prices Today: आजचे प्रति 10 ग्रॅम सोने आणि प्रति किलो चांदी दर घ्या जाणून
Gold Jewelery | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

देशातील सोने-चांदी दरात (Gold, Silver Prices Today) सोमवारी (22 नोव्हेंबर) किरकोळ उतारचढाव पाहायला मिळाले. सोने दर किरकोळ वाढीसह प्रति दहा ग्रॅम 48,860 रुपये तर 22 कॅरेट सोने दर प्रति दहा ग्रॅम 47,860 रुपये इतका आहे. चांदी दर ( Silver Price Today) (Gold Price Today) विचारात घ्यायचा तर प्रति किलो 65,665 रुपये इतका दर आहे. आठवडी बाजाराच्या पहिल्याच दिवशी वायदेबाजारात सोने दर किरकोळ वाढ होताना दिसले. पाठिमागील आठवड्यात बाजार बंद झाला तेव्हाच्या तुलने आजचा दर प्रती 10 ग्रॅम म्हणजेच एक तोळ्यास 0.07% वाढून 48,860 रुपये इतका झाला. तर चांदी दर आज 0.17% तेजी घेताना दिसले.

सोमवारी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर किरकोळ वाढ होऊन 48,860 रुपये प्रति दस ग्रॅम झाला. तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 47,860 रुपये आहे. यासोबच चांदीच्या दरातही वाढ झाली. चांदीची किंमत आज 65,665 रुपये प्रति किलो आहे. (हेही वाचा, Gold Quality and Purity: शुद्ध असूनही 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनवले जात नाहीत, जाणून घ्या कारण)

विविध राज्यांमध्ये उत्पादन शुल्क वेगवेगळे असल्याने राज्यनिहाय सोने, चांदी दरात फरक असू शकतो. कधी हा फरक अधिक असतो कधी कमी. त्यातच जर तुम्ही सोने, चांदी दागिणे खरेदी करत असाल तर त्यावर घडणावळ म्हणजे मेकींग चार्जेसही लागतात. मुंबई आणि दिल्ली शहरातील चांदी दरावर नजर टाकता प्रति किलो हा दर 65,665 रुपये आहे. तर चेन्नईत चांदी प्रति किलो 70,400 रुपये आहे.

दागिने बनविण्यासाठी प्रामुख्याने 22 कॅरेट सोन्याचाच वापर होतो. यात काही लोक 18 कॅरेट सोन्याचाही उपयोग करतात. सोने दागिने कॅरेट अनुसार हॉल मार्कचे बनतात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिण्यांवर 999 असा शिक्का असतो. 23 कॅरेट दागिन्यावर 958, 22 कॅरेट दागिन्यावर 916, 21 कॅरेट वर 875 आणि 18 कॅरेट वर 750 लिहीलेले असते.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशन नुसार आपण केवळ एक मिस्ड कॉल देऊनही सोने, चांदी दर जाणून घेऊ शकता. त्यासाठी आपणास 8955664433 या क्रमांकावर एक मिसकॉल द्यावा लागेल.ज्या फोन नंबरवरुन आपण मिस कॉल द्याल त्याच क्रमांकावर आपल्याला हे दर उपलब्ध होऊ शकतील.