Gold, Silver Price Today: सोने दरात घसरण, पाहा प्रमुख शहरातील गोल्ड रेट देशातील
Jewellery (Photo Credits: Pixabay)

सोने चांदी दरात (Gold-Silver Price Today) आज काहीशी घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे तुम्ही जर सोने खरेदी करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही एक सूवर्णसंधी ठरु शकते. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर आज ऑक्टोबरच्या डिलीवरीचा सोने दर 0.15%नी घसरल्याचे दिसते आहे. तर चांदीच्या दरातरी (Silver Price) 0.22% इतकी घसरण पाहायला मिळते आहे. ऑक्टोबर डिलीव्हरी सोने दर आज 0.15 % घसरणीसह 46,001 रुपये प्रति 10 ग्राम आहेत. तर त्याच तुलनेत चांदीचा विचार करायचा तर आज चांदी 0.22% इतकी घसरली आहे. आज एक किलो चांदीचा दर 60,503 रुपये इतकी आहे.

सन 2020 मध्ये सोने दर MCX वर 10 ग्रॅम सोन्याचे दर प्रती 10 ग्रॅम 56,200 रुपये इतक्या अत्युच्च स्तरावर पोहोचले होते. आज सराफा बाजारात सोने 46,001 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे. म्हणजेच विक्रमी विक्रीनंतर सोने तब्बल 10,200 रुपये स्वस्त दरांनी विकले जात आहे. (हेही वाचा, Petrol-Diesel Prices Today: मागील 2 महिन्यात आज पहिल्यांदा वाढले पेट्रोलचे दर; जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचा दर)

देशातील प्रमुख शहरातील सोने दर (22 कॅरेट प्रती 10 ग्रॅम) 

 • चेन्नई- 43,510 रु.
 • मुंबई- 45,280 रु.
 • दिल्ली- 45,500 रु.
 • कोलकाता- 45,750 रु.
 • बंगळुरु- 43,350 रु.
 • हैदराबाद- 43,350 रु.
 • केरळा- 43,350 रु.
 • पुणे- 44,480 रु.
 • अहमदाबाद- 44,480 रु.
 • जयपूर- 45,300 रु.
 • लखनऊ- 44,100 रु.
 • पाटना- 44,480 रु.
 • नागपूर- 45,280 रु.

आपण घरबसल्याही सोन्याचे दर जाणून घेऊ शकता. त्यासाठी आपल्याला केवळ 8955664433 या फोन क्रमांकावर मिस्ड कॉल द्यायचा आहे. त्यानंतर आपल्या फोनवर आलेल्या मेसेजवरुन आपण सोन्याचे लेटेस्ट दर तपासून पाहू शकता.