सोने बाजार बुधवारी (10 नोव्हेंबर) काहीसा पुन्हा एकदा काळवंडताना दिसला. सोने (Gold Rate) बाजारात 2021 मध्ये पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळते आहे. दिवाळीमध्ये सराफा बाजार काहीसा वधारताना दिसला होता. मात्र, मंगळवारी पुन्हा एकदा बाजारात उतार पाहायला मिळलाा. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने सकाळी साडेनऊच्या दरम्यान सोने 0.14% घसरताना पाहायला मिळाले. 69 रुपयांच्या साधारण घसरणीसह सोन्याचा आजचा दर प्रति तोळा म्हणजेच प्रति 10 ग्रॅमवर 48,218 रुपये इतका पाहायाल मिळतो आहे. तर त्या तुलनेत चांदी काहीशी उजळली आहे. एमसीएक्सवर चांदी (Silver Price) दरात 0.37% वधार पाहायला मिळत आहे. प्रति किलो ग्रॅम 237 रुपयांच्या वधारासह चांदी 64,570 रुपयांवर आहे.
आंतरराष्ट्रीय सोने बाजारात मात्र तेजी पाहायला मिळत आहे. GoldPrice.org वर पाहिले तर आंतरराष्ट्रीय सोने बाजारात भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता सोने 0.15% तेजी पाहायाल मिळाली. सोने 1,827.22 रुपये प्रति ग्रॅमवर होते. स्थानिक सराफा बाजाराबाबत विचार करायचा तर मंगळवारी सोने दरात किरकोळ वाढ पाहायला मिळाली. जागतिक बाजारात सेन्याची किंमत काहीशी वधारली. दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी 103 रुपये वाढून प्रति दहा ग्रॅम 47,124 रुपये इतका झाला.चांदीही 119 रुपयांनी वाढून 63,525 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला. (हेही वाचा, Gold Quality and Purity: शुद्ध असूनही 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनवले जात नाहीत, जाणून घ्या कारण)
देशातील प्रमुख शहरांतील सोने दर (प्रति 10 ग्रॅम)
दिल्ली
22 कॅरेट- 47,140 रुपये
24 कॅरेट- 51,390 रुपये
मुंबई
22 कॅरेट- 46,980 रुपये
24 कॅरेट- 47,980 रुपये
कोलकाता
22 कॅरेट- 47,440 रुपये
24 कॅरेट- 50,140 रुपये
चेन्नई
22 कॅरेट- 45,450 रुपये
24 कॅरेट- 48,060 रुपये
चांदीबाबत बोलायचे तर चांदी प्रति किलोग्रॅम 64,700 रुपए आहे. दिल्लीमध्ये चांदी प्रति किलो 64,700 रुपए आहे. तर मुंबई आणि कोलकाता येथेही चांदी दर प्रति किलो 64,700 रुपए इतकाच आहे. चेन्नईमध्ये चांदी प्रति किलो 69,300 रुपए इतकी आहे.