Gold-Silver Price Today: आजचे सोने-चांदी दर घ्या जाणून
Gold Jewelery | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

सोने बाजारात आज (6 ऑक्टोबर 2021) पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. यूएस ट्रेजरी यील्डमध्ये आलेली तेजी आणि मजबूत झालेला डॉलर यांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर (Gold Price Today) काहीसे घसरताना दिसले. ज्याचा परिणाम स्थानिक सोने बाजारातही झाला. मल्टी कमोडिटी एक्चेंजवर आज गोल्ट फ्यूचर 0.35% घसरुन 46,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला. तर सिल्वर फ्यूचर मध्ये 0.6% घसरण पाहायला मिळाली. मेटल 60,623 रुपये प्रति किलोवर पोहोचले.

सोने चांदी दराबाबत माहिती देणाऱ्या GoldPrice.org नुसार आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय वेळेनुसार सकाळी 09.38 वाजता MCX वर सोने 0.28 % घरताना पाहायला मिळाले. चांदी 0.66% वरुन घसरुन 22.48 डॉलर प्रति औंसवर पोहोचली. (हेही वाचा, LPG Cylinder Price Hike: घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 15 रुपयांनी वाढ; आजपासून लागू होणार नवे दर)

देशातील प्रमुख शहरांतील सोने दर (प्रति 10 ग्रॅम)

दिल्ली

22 कॅरेट- 45,650 रुपये

24 कॅरेट- 49,800 रुपये

मुंबई

22 कॅरेट- 45,490 रुपये

24 कॅरेट- 46,490 रुपये

कोलकाता

22 कॅरेट- 46,000 रुपये

24 कॅरेट- 48,700 रुपये

चेन्नई

22 कॅरेट- 43,050 रुपये

24 कॅरेट- 48,060 रुपये

चांदी दराबाबत बोलायचे तर चांदी 60,600 रुपए प्रति किलो दराने विकली जात आहे. दिल्लीमध्ये चांदी 60,600 रुपए प्रति किलो रुपये प्रति किलो. तर, मुंबई आणि कोलकाता येथेही चांदी 60,600 रुपए प्रति किलो याच दराने विकली जात आहे. चेन्नई मध्ये मात्र चांदी 64,800 रुपए प्रति किलो दरावे विकली जात आहे.